नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 08, 2025
- 125
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे आज (8 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. गेल्या 28 वर्षांपासून पाहिलेले हे स्वप्न अखेर आज प्रत्यक्षात साकार झाले आहे. या नवीन विमानतळामुळे मुंबईतील हवाई प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळप्रकल्पामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेले उद्घाटन अखेर 8 ऑक्टोबर रोजी पाप पडले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते भूमिपुत्र दिबा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि आपल्या भाषणांमध्ये स्मरण केले. दि.बा पाटील यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं असून त्यांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. समाज जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच ते प्रेरणा देत राहतील असं मोदी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय लढा सुरू होता. दरम्यान, मोदी म्हणाले की, मुंबईला आपले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे, ज्यामुळे या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हब म्हणून स्थापित करण्यात मोठी भूमिका मिळेल. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बांधले गेले असून त्याचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे, जो संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. उदघाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी परिसराची पाहणी केली.
नवी मुंबई विमानतळावरून प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होईल. पुढील पाच ते सात वर्षांतच मुंबईचे सध्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
- दिबांच्या कार्याचा गौरव पण नामकरणावर चुप्पी
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिबा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला मात्र नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचेच नाव लागणार हे ठोसपणे सांगितले नाही. त्यामुळे भुमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येईल असे भाषणातून अपेक्षित होते अशी भावना उपस्थितांसह दि.बा.पाटील यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai