‘जबाबदार पर्यटन’ विषयक पथनाट्याव्दारे जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 64
नवी मुंबई : विभागीय पर्यटन कार्यालय, कोकण यांच्या वतीने ‘जबाबदार पर्यटन’ या संकल्पनेविषयी जनजागृती करण्यासाठी कोकण भवन इमारतीच्या आवारात पथनाट्य सादर करण्यात आले. हा उपक्रम पुरस्कृत असून, ‘जबाबदार पर्यटन’ या विषयावर आधारित होता.
या पथनाट्यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक पर्यटन आणि जबाबदार प्रवास याबाबत संदेश देण्यासाठी विभागीय पर्यटन कार्यालयाच्या टीमसह विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या पथनाट्याव्दारे सागरी किनाऱ्यांवरील स्वच्छता, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्रदूषण टाळणे आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली. पर्यटन स्थळे ही फक्त पाहण्याची ठिकाणे नसून, ती आपली जबाबदारी आहेत, हा महत्त्वपूर्ण संदेश देत ‘जबाबदार पर्यटक बना’ ही भूमिका मांडण्यात आली.
या प्रसंगी विभागीय पर्यटन कार्यालय, कोकणचे कर्मचारी हृषिकेश नारकर, वंदिता पावसे, सोनम पवार, पंकज सावंत, विठ्ठल अर्जुने तसेच कोकण भवन इमारतीतील विविध विभागांतील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai