विद्यार्थीनीच्या कुटूंबाला न्याय देण्याचा निर्धार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 61
नवी मुंबई ः ऐरोलीतील एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने परिक्षेत कॉपी केली म्हणून उपमुख्याध्यापिकांनी सर्वांसमोर तिला इपमानि केल्याने सदर विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची घटना 3 ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून संशयित आरोपी फरार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थीनीच्या कुटूंबाची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
ऐरोलीतील एका बड्या शाळेत ही विद्यार्थीनी इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेत सहामाही परीक्षा सुरु असताना या विद्यार्थीनीच्या बाकड्याखाली शिक्षिकेला चिट्ठी सापडली. कोणतीही खात्री अथवा चौकशी करण्याऐवजी ती कॉपी करत असल्याचे सांगत शिक्षिकेने तिला सर्वांदेखत अवमानकारक भाषा वापरली. तिच्या आर्थिक परिस्थितीवरून जातिवाचक भाषा त्या शिक्षिकेने वापरली. संपूर्ण शाळेत तिला सर्वांसमक्ष फिरवून तिची बदनामी केली गेली. हा अपमान सहन झाला नसल्यामुळे 16 वर्षीय विद्यार्थीनीने मानसिक तणावाखाली जाऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. मुलीच्या कुटुंबियांची खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेऊन सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
खासदार नरेश म्हस्के यांनी पालकांसमक्ष पोलीस आयुक्त मिलिंद भामरे, उपायुक्त पंकज दहाने तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याला भेट दिली. सदर घटनेची गंभीर चौकशी करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. पोलीसांनी 2 दिवसांत कारवाई करण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना आश्वासन दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai