अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांना क्लीनचीट
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 126
नवी मुंबई : बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आले आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना ही ‘क्लीनचीट’ देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
न्या. दिलीप भोसले यांच्या आयोगाने ‘स्वसंरक्षणासाठी’ अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा मान्य केला आहे. या निर्णयामुळे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना कायदेशीर दिलासा मिळाला आहे. यापूर्वी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार केली नसल्यामुळे राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना ‘क्लीनचीट’ मिळाली होती. गोळीबार स्वसंरक्षणासाठी झाल्याचा दावा मान्य केला असला तरी, आयोगाने आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर मात्र काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोगाने या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेच्या केलेल्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. तर ही ‘एसआयटी’ कोर्टाने नव्हे, तर ‘डीजीपीं’ना स्थापन करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाचे होते. आता न्या. दिलीप भोसले आयोगानेही पोलिसांना निर्दोष ठरवल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai