Breaking News
कामात गतीमानतेचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने ऐरोली से.5 येथे भूखंड क्र.37 वर बांधण्यात येत असलेल्या नुतन नाटयगृहाच्या सुरु असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सद्यस्थितीत या नाट्यगृहाचे 65 टक्के काम पुर्ण झाले आहे. यावेळी कामात गती वाढवून नवीन वर्षाच्या प्रारंभी काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणीअंती दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथे विष्णुदास भावे नाटयगृह असून कला व संस्कृतीप्रेमी रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेऊन ऐरोली येथे नवीन नाटयगृह उभारण्याचे काम सुरु आहे. या बांधकामाची संपूर्ण पाहणी करुन येथील कामाच्या प्रगतीचा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईनी आढावा घेतला. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वास्तुविशारदांनी केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण पाहून आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. या प्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता संजय पाटील व संबधित अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे साधारणत: 65 टक्के काम पूर्ण झाले असून या कामाची गुणवत्ता राखत कामाला गती द्यावी व नवीन वर्षाच्या प्रारंभापर्यंत काम पूर्ण करण्याचे कालबध्द नियोजन करावे असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले. 860 आसन क्षमतेचे हे नाटयगृह 4 मजली उंचीची असून या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या बेसमेंटमध्ये चार चाकी व दुचाकी वाहन तळाची व्यवस्था आहे. याठिकाणी तळ मजल्यावर काही भाग वाहनतळाचा असून मुख्य प्रवेशव्दारावर स्वागत कक्ष, तिकिट बुकींग कार्यालय, फुड काउुंटर, प्रशासकीय दालन, भांडार गृह तसेच नाटय साहित्याची ने-आण करण्याकरीता स्वतंत्र प्रवेशव्दार आहे.
अशी असेल रचना
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai