एनएमआयएमएसमध्ये मानसिक आरोग्यावर चर्चासत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2025
- 177
नवी मुंबई : कमकुवत वाटणं हे जीवनाचा आणि मानवी अनुभवाचा एक भाग आहे या विषयावर मुक्तपणे संवाद होणं गरजेचं आहे,” असं मत एनएमआयएमएस नवी मुंबईच्या समुपदेशक मानसोपचारतज्ज्ञ देवांशी राव यांनी व्यक्त केले. त्या ‘द रोल ऑफ कम्युनिटी इन मेंटल हेल्थ अँड वेल-बिइंग’ या चर्चासत्रात बोलत होत्या.
एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, नवी मुंबईतर्फे मेंटल हेल्थ अवेअरनेस वीक निमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, भावनिक बुद्धिमत्ता आणि समुदायभावना वाढवणे हा होता. या चर्चेत अनमोलप्रीत सिंग, संघटनात्मक व सामुदायिक मानसशास्त्रज्ञ, आणि इप्सिता चॅटर्जी, मानसोपचारतज्ज्ञ व ‘थहराव: अनवाइंड योर माइंड’ संस्थापक, सहभागी झाल्या होत्या.
देवांशी राव यांनी दैनंदिन संवादांमधून मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “समुदाय म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक व्यक्ती मित्र, सहकारी, परिचित, प्रवासात भेटणारे लोक किंवा घरकाम करणारे हे सर्व आपल्या जीवनावर परिणाम करतात. कोणी धक्का दिला, कोणी काही बोललं, ‘कसं चालायचं शिक’ अशा छोट्या गोष्टीही मनावर परिणाम करतात. कारण समाजच ठरवतो काय योग्य, काय निरोगी, आणि आपली ‘आदर्श’ प्रतिमा काय असावी. इप्सिता चॅटर्जी यांनी समावेशकतेवर भर देत सांगितले की, “समुदायात लिंग, जात, लैंगिकता आणि अदृश्य श्रम यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. समावेशकतेची सुरुवात जागरूकतेतून आणि स्वतःच्या पूर्वग्रहांना मान्य करण्यातून होते. अनमोलप्रीत सिंग यांनी सांगितले, “भारतीय समाज मूलतः सामूहिक आहे. लहानपणी शेजार, मित्र, आणि ओळखीच्या लोकांतून शिकलेली सहकार्याची वृत्ती आजच्या डिजिटल जगात हरवताना दिसते.
कार्यक्रमादरम्यान रेनेसन्स ऑर्गनायझेशनमधील 36 मुलांना कॅम्पसवर आमंत्रित केले होते. त्यांच्यासाठी विशेष भावनिक आणि संज्ञानात्मक उपक्रम आयोजित करुन आर्ट कॉर्नर, ट्रॅन्क्विल टेंट, आणि कॉग्निटिव्ह रूमसारखे उपक्रमात ते सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी व्हिस्पर्स अँड वंडर्स, माइंड स्क्रॅबल, कम्युनिटी टॉवर आणि हँड टू हार्ट यांसारख्या खेळांतून भावनिक समज व सहानुभूती वाढवली. कार्यक्रमाचा समारोप वन स्टेज, काउंटलेस कनेक्शन्स या रंगतदार सादरीकरणाने झाला, ज्याने एकत्रतेचा आणि समुदायभावनेचा उत्सव साजरा केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai