वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्राच्या स्टॉलला पसंती
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 33
‘इंडिया मेरिटाईम विक 2025’ परिषदेत मांडलेल्या
नवीमुंबई ः नौवहन क्षेत्र विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेली ‘इंडिया मेरीटाईम विक 2025’ ही अभिनव परिषद मुंबई येथे सुरू आहे. केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त सहयोगाने कार्यान्वित वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाविषयी (टीआरएफ) माहिती देणारा स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आलेला आहे. या स्टॉलला अनेक देशीपरदेशी नागरिकांची पसंती लाभत आहे.
वस्त्र कचऱ्यावर ठोस उपाययोजना करणारा हा देशातील पहिला प्रकल्प असून हा प्रायोगिक स्वरूपातील पायलट प्रोजेक्ट “पोस्ट कंझ्युमर टेक्सटाईल मॅनेजिंग बाय टेक्सटाईल व्हॅल्यू चेन बाय मॅनेजिंग पोस्ट कंझ्युमर टेक्सटाईल”अल्पावधीतच नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच देशभराचे लक्ष वेधणारा ठरला आहे. याव्दारे कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या कापडी कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणला जात असून याव्दारे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे मोठे काम होत आहे. ीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे कार्यान्वित वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्रातील ( टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी - टीआरएफ) समुहाने वस्त्र कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर याद्वारे वस्त्र कचरा हा पालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी न नेता त्याचा पुनर्वापर करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्राला मिळत असलेल्या नागरिकांच्या उत्साही सहकार्यामुळे हा उपक्रम अल्पावधीतच यशस्वी झाला असून त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे प्रदर्शन या परिषदेठिकाणी मांडलेल्या स्टॉलमधील विविध बाबींमधून करण्यात आले असल्याची माहिती उपआयुक्त स्मिता काळे यांनी दिली.
त्याचप्रमाणे ही परिषद सागरी जीवनाशी संबंधित बाबींवर असल्याने या प्रदर्शनात मांडलेल्या स्टॉलद्वारे जैवविविधता आणि जलचर जीवनावर कापडी कचऱ्याचा कसा परिणाम होतो याची माहिती देण्यावर भर देण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमधून गोळा केलेल्या पोस्ट कंझ्युमर टेक्सटाईल कचऱ्यापासून टीआरएफमधील महिला कारागिरांनी तयार केलेल्या शाश्वत उत्पादनांचाही समावेश या प्रदर्शनात करण्यात आलेला आहे. त्याला अनेक देशीपरदेशी नागरिकांची पसंती लाभत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai