बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 36
मुंबई ः बालदिनाचे औचित्य साधत चेंबूर येथे शिलक्ष्मी सोशल फाऊंडेशनतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हेोते. परिसरातील 3 ते 7 वर्षे वयोगटातील लहान मुलांनी स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला. निसर्ग, प्राणी, राष्ट्रीय प्रतीके, सण, स्वप्नातील जग इत्यादी अनेक विषयांवर सुंदर चित्रे काढून स्पर्धेची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे विशेष पाहुणे आयसीआयसीआय प्रुडनशिअलचे अमेय वर्मा आणि ज्ञानेश्वर लांजेवार यांनी मुलांच्या सर्जनशील कार्याचे कौतुक करत, ‘बालकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे,’ असे मत व्यक्त केले. त्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांना पुढेही कला-साहित्य क्षेत्रात सक्रिय राहण्याचे प्रोत्साहन दिले. शिलक्ष्मी सोशिएल फौंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजणे यांनी बालदिनाचे ऐतिहासिक महत्त्व, मुलांच्या मानसिक विकासात कलात्मक उपक्रमांचे स्थान यावर प्रकाश टाकला. त्यांनी संस्थेच्या पुढाकारांबद्दल पालकांना माहिती देत बालकल्याणासाठी भविष्यात आणखी उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. रंगीत पेन्सिली, क्रेयॉन्स, ब्रशेस, रंग आणि रेखाटण्यासाठी आकर्षक चित्रफलक या सर्व सामग्रीसह मुले उत्साहाने सहभागी झाली होती. मुलांनी निसर्ग, प्राणी, राष्ट्रीय प्रतीके, सण, स्वप्नातील जग इत्यादी अनेक विषयांवर सुंदर चित्रे काढली. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, रंगांशी बोलणारे त्यांचे हात आणि कुतूहलतृष्णेने झळकणाऱ्या त्यांच्या डोळ्यांनी संपूर्ण सभागृहात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. परीक्षकांनी मुलांची चित्रे तपासून गुणांकन केले. विविध निकषांवर आधारित पहिला क्रमांक अदिती साळवी, दुसरा क्रमांक आफिया शेख , तर तिसरा क्रमांक वेदांत साळवी यांनी पटकावला. प्रत्येक सहभागीला मिठाई आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
संस्थेची संपूर्ण टीम तसेच स्वयंसेवक जतिन पवार, अक्षय दळवी, उज्वल सोनी, अलींना शेख, मुस्कान शेख रक्षित ताजणे आणि प्रणाली कडलाक यांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष देत मुलांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि मदत केली. या संपूर्ण उपक्रमाला पंचशील तरुण मित्र मंडळचे अध्यक्ष संजय पवार आणि त्यांची टीम ने सहाय्य, व्यवस्थापन आणि समन्वय पुरवला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai