आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 54
नवी मुंबई ः वाशी, नवी मुंबई येथील साई प्रेम सेवा केंद्रात श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित आठवडाभर चालणाऱ्या उत्सवाचा एक भाग म्हणून मोफत बहुविशेषज्ञ वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री सत्य साई ट्रस्ट आणि श्री सत्य साई सेवा संघटना यांच्या वतीने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वैद्यकीय शिबिरात विविध शाखांतील एकूण 18 नामांकित डॉक्टरांनी सहभाग घेतला. त्यांनी 294 लाभार्थ्यांची तपासणी करून मोफत वैद्यकीय सल्ला दिला. कार्डियोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गायनॅकोलॉजी, युरोलॉजी, त्वचारोग, मानसोपचार, नेत्ररोग, ईएनटी, दंतवैद्यक आणि आयुर्वेद अशा विविध विशेषतांचा समावेश होता, ज्यामुळे लाभार्थ्यांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा मिळाली. डी.वाय.पाटील डेंटल कॉलेजचे मा. संचालक व वैद्यकिय विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत रणखांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले.
शिबिरासाठी सत्य साई सेवादलातील 43 स्वयंसेवक 29 महिला आणि 14 पुरुष यांनी सेवा दिली. शंकर सुंदरम, आर. मुरली आणि इतर स्वयंसेवकांनी डॉक्टरांना विविध कामांत सहकार्य केले. लाभार्थ्यांना वैद्यकीय तपासणीबरोबरच मोफत औषधे आणि नाश्ता देखील देण्यात आला. वाशी युनिटचे कन्व्हेनर आदित्य सुब्रमण्यम यांनी शिबिराची पाहणी केली, तर जिल्हा सेवा समन्वयक पंढरीनाथ हराळ यांनी सर्व सहभागी आणि सेवकांचे मनापासून आभार मानले. शिबिराची सांगता भगवान श्री सत्य साई बाबांच्या प्रार्थनेने मानवंदना देवून करण्यात आली. या उपक्रमामुळे वाशी परिसरात समाजसेवेचा आणि आरोग्यसेवेचा सुंदर संदेश पसरला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai