नवी मुंबईला मिळणार महिला महापौर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 22, 2026
- 94
कोणाला मिळणार ‘प्रथम नागरिक’ होण्याचा मान याची उत्सुकता; महिलेला पाचव्यांदा संधी
नवी मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. निकालानंतर अनेक ठिकाणी मोठे बदल झालेले पहायला मिळाले. कोणाला वर्षांनुवर्षाच्या सत्तेला मुकावे लागले तर कोणाला बहुमताने सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. या सर्व घडामोडींनंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापौरपद कोणाला मिळते याकडे. यापदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. 29 पैकी 15 महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित असणार आहे. यामध्ये नवी मुंबईचे महापौरपद हे खुला प्रवर्ग (महिला) यासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे 60 टक्के नगरसेविका असणाऱ्या या महापालिकेत आता महापौरपदी महिलाच विराजमान होणार आहे. त्यामुळे आता ही माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नवी मुंबई महापालिकेत 111 जागांसाठी 28 प्रभागांमध्ये निवडणुक पार पडली. यामध्ये 65 जागी भाजप, 42 जागी शिवसेना, 2 जागी उबाठा, मनसे आणि अपक्ष प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आले आहेत. या 111 जागांवर 63 महिला नगरसेविका तर 49 पुरुष नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेत महिलांराज पाहायला मिळणार आहे. भाजपचे 65 जागा आल्या असून त्यात 36 महिलांचा समावेश आहे. शिवसेनेच्या 42 जागा आल्या त्यापैकी 26 महिला आहेत. यात 2 जोड्या माय-लेक, 1 काकी-पुतणी अशा आहेत. आता महापौर पद हे सुद्धा खुला प्रवर्ग( महिला) यासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे पालिकेत महिलांचा आवाज चांगलाच घुमणार आहे. यापुर्वी नवी मुंबईत पाच वेळा महापौरपद महिलांसाठी आरक्षित झाले हेोते. आता पाचव्यांदा महिलेला संधी मिळाली आहे. निवडून आलेल्यांमध्ये अनेक महिला जुन्या आहेत तर काही नव्याने प्रवेश करणार आहेत. आता 63 महिलांपैकी महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्य्ाात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सगळ्यांजणी आता शहराच्या विकासासाठी, नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकुणच शहराच्या प्रगतीत कसा हातभार लावतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सभागृहात या समस्त 63 महिला आपला आवाज कसा बुलुंद करतात आणि त्याद्वारे शहराचा विकास साधतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागलेआहेत.
- आधी महापौरपद भुषविलेल्या महिला
नवी मुंबई महापालिकेत पहिली महापौर महिला होण्याचा मान सुषमा दंडे यांना मिळाला होता. त्यानंतर मनीषा भोईर, अंजनी भोईर, विजया म्हात्रे यांनी महापौरपद भुषवले आहे. यावेळी या पदाचे आरक्षण खुला महिला प्रवर्ग जाहीर झाल्याने याजागी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.
महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?
- अनुसूचित जमाती- 1, अनुसूचित जाती- 3, ओबीसी- 8, सर्वसाधारण प्रवर्ग -17
- कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?
- 1 बृहन्मुंबई सर्वसाधारण- महिला
- 2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
- 3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
- 4 नवी मुंबई सर्वसाधारण- महिला
- 5 वसई-विरार सर्वसाधारण-महिला / पुरूष
- 6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण- महिला / पुरूष
- 7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण- महिला
- 8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष
- 9 पुणे सर्वसाधारण- महिला
- 10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण- महिला / पुरूष
- 11 नागपूर सर्वसाधारण- महिला
- 12 अहिल्यानगर ओबीसी- महिला
- 13 नाशिक सर्वसाधारण- महिला
- 14 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण-महिला किंवा पुरुष
- 15 अकोला ओबीसी-महिला
- 16 अमरावती सर्वसाधारण- महिला किंवा पुरुष
- 17 लातूर अनुसूचित जाती (एससी)- महिला
- 18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण-महिला
- 19 चंद्रपूर ओबीसी- महिला
- 20 धुळे सर्वसाधारण- महिला
- 21 जळगाव ओबीसी- महिला
- 22 मालेगाव सर्वसाधारण-महिला
- 23 कोल्हापूर ओबीसी-महिला किंवा पुरूष
- 24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
- 25 सोलापूर सर्वसाधारण-महिला / पुरूष
- 26 इचलकरंजी ओबीसी- महिला किंवा पुरूष
- 27 जालना अनुसूचित जाती (एससी)- महिला
- 28 पनवेल ओबीसी- महिला किंवा पुरूष
- 29 परभणी सर्वसाधारण-महिला / पुरूष
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai