कोकण रेल्वेचे ‘ऑन-द-स्पॉट’ सेफ्टी पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 90
नवी मुंबई ः कोकण रेल्वेने सुरक्षा आणि सतर्कतेची संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी ‘ऑन-द-स्पॉट कॅश अवॉर्ड’ ही उपक्रमशील योजना राबवली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी सुरक्षा धोक्यांची वेळेवर ओळख करून तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी केआरसीएल संतोष कुमार झा यांनी ही योजना सुरू केली आहे. या उपक्रमामुळे कर्मचारी सतर्क राहण्यास प्रोत्साहन मिळते आणि प्रवासी तसेच रेल्वे ऑपरेशन्स सुरक्षेप्रती ची निष्ठा अधोरेखित होते.
आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत विविध विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी संभाव्य धोके ओळखून तातडीने कारवाई करत अपघाताची शक्यता टाळली. त्यांच्या जागरूकतेमुळे रेल्वे वाहतूक सुरळीत राखण्यात मदत झाली. या सन्मानामुळे कोंकण रेल्वेच्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची सुरक्षा जपण्यातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. त्यांच्या सतर्कतेमुळे प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षा अबाधित राहते तसेच अन्य कर्मचाऱ्यांनाही अधिक जागरूक राहण्यासाठी प्रेरणा मिळते.कोंकण रेल्वे सुरक्षितता प्रणाली अधिक मजबूत करण्यास कटिबद्ध असून, आगामी काळातही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करत राहील.
पी. व्ही. रावळ
कारवाई: पाईंट व क्रॉसिंग स्टॉक रेलमध्ये फ्रॅक्चर आढळून ते वेळेवर कळवून संभाव्य रुळावरून घसरणे (डिरेलमेंट) टाळले.
पुरस्कार: 15,0002.
कु. सुविधा स्वामी
कारवाई : रेकमधील लोंबकळणारी पाईप ओळखून तत्काळ कळवली; संभवित बिघाड टाळला.
पुरस्कार: 1,0003.
नारायण नेमळेकर
कारवाई : रेकमधील लोंबकळणारी पाईप वेळेवर ओळखून कळवली.
पुरस्कार : 1,0004.
श्री रणजीत सिंह, श्री महेंद्र पाल (कर्मचारी) आणि श्री वीर सिंह (अधिकृत विक्रेता)
कारवाई : ट्रेन क्र. मधून उतरताना घसरलेल्या प्रवाशाला धाडस आणि तत्परतेने वाचवले; त्यांचा जीव वाचविण्यात यश.
पुरस्कार : प्रत्येकी 5,0005.
पी. एल. सावंत, ट्रॅकमॅन
कारवाई : बोगद्यातील रुळातील फ्रॅक्चर वेळेवर शोधून मोठा अपघात टाळला.
पुरस्कार : 10,0006.
संदीश चव्हाण
कारवाई : ट्रेन क्र. 11003 (तुतारी एक्सप्रेस) मध्ये एका संशयित व्यक्तीकडून एका मुलाला सुरक्षितपणे वाचवले.
पुरस्कार : 15,000
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai