‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 51
7 हजार नागरिकांचा उत्साहाने सहभाग
नवी मुंबई ः स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा जागर करीत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025 हा उपक्रम यशस्वी केला. सकाळी ठीक 4.30 वा सुरू झालेल्या हाफ मॅरेथॉनमधील सर्वाधिक 32 किमी. अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: धावपटू म्हणून सहभागी होत नागरिकांसमवेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत ही हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.
5, 10, 21 आणि 32 किमी अंतराच्या वेगवेगळ्या गटांमध्ये लेट्स सेलिब्रेट फिटनेस यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील स्त्री-पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये युवकांची संख्या लक्षणीय होती. सकाळी 4.30 वा. या हाफ मॅरेथॉन मधील 32 किलोमीटर अंतराच्या गटाला सुरूवात होऊनही इतक्या पहाटे मोठ्या संख्येने आणि उत्साहाने धावपटू उपस्थित होते. नागरिकांनी उत्साही व उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथ़ॉन उपक्रम यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिव्यांगांनीही सहभागी होत प्रेरणादायी उपस्थिती दर्शविली याचा विशेष उल्लेख केला.
स्वच्छ व पर्यावरणशील शहर ही नवी मुंबईची ओळख असून आरोग्यपूर्ण शहराचे ध्येय नजरेसमोर ठेवून आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे तसेच हाफ मॅरेथॉन आयोजनात सहयोग देणाऱ्या लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिल व गुरुद्वारा श्री दशमेश दरबार आणि इतर सहयोगी संस्थांचे आयुक्तांनी आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai