रहेजा आगप्रकरणी दोघांवर निष्काळजीपणाचा गुन्हा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 40
नवी मुंबई : वाशी सेक्टर 14 मधील रहेजा रेसिडेन्सी इमारतीत गत 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आग दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रहेजा रेसिडेन्सी या इमारतीचे लाईफ सेव फायर सर्व्हिसेसचा ऑपरेटर आणि सोसायटीचा मॅनेजर या दोघांनी फायर फायटींग व्यवस्थेतील त्रुटी व आवश्यक दुरुस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला अडथळे निर्माण झाल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यानुसार वाशी पोलिसांनी या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाशी सेक्टर 14 मधील रहेजा रेसिडेन्सी इमारतीत गत 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बी विंग मधील 10,11 व 12 मजल्यावर भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील वेदीका सुंदर बालकृष्णन (6), सुंदर बालकृष्णन (44), पूजा राजन (39) या तिघांचा व कमला हिरालाल जैन (84) या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच दहा जण जखमी झाले होते. त्यावेळी प्राथमिकदृष्टया शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. मात्र नंतर झालेल्या तपासादरम्यान सदर इमारतीतील फायर फायटिंग सिस्टम योग्य प्रकारे कार्यरत नसल्याचे व त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात अडथळे निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. तपासानुसार, लाईफ सेव फायर सर्व्हिसेसचे ऑपरेटर प्रदीप भिमराव पाटील आणि सोसायटीचे मॅनेजर संजय विठ्ठल उबाळे यांनी फायर फायटींग व्यवस्थेतील त्रुटी व आवश्यक दुरुस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांनी ही माहिती सोसायटीतील पदाधिकारी किंवा रहिवाश्यांना कळविली नसल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी या आगीच्या दुर्घटनेला लाईफ सेव फायर सर्व्हिसेसचे ऑपरेटर प्रदीप भिमराव पाटील आणि सोसायटीचे मॅनेजर संजय विठ्ठल उबाळे या दोघांना जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात बीएनएस कलम 106(1) अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाई सुरु केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai