64 ठिकाणी आय.टी.एम.एस. सिग्नल यंत्रणा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 34
नवी मुंबई ः शहरात जवळपास सर्व सिग्नल्सच्या ठिकाणी विशेषतः गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत होते. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने आय.टी.एम.एस. (इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम) तंत्रज्ञान आधारित सिग्नल यंत्रणा राबविण्याच्या कामाला सुरवात केली आहे. ही वाहतूक पाहून सिग्नलची वेळ कमी-जास्त करणारी स्वयंचलित यंत्रणा आहे. त्यामुळे जवळ जवळ असणाऱ्या दोन सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही.
नवी मुंबईत एकूण 58 ठिकाणी सिग्नल असून त्यात अजून सहा ठिकाणांची भर पडणार आहे. एकूण 64 ठिकाणी अत्याधुनिक आय.टी.एम.एस. तंत्रज्ञान आधारित सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी सिग्नल तोडणे, अर्ध्या रस्त्यापर्यंत गाड्या थांबवणे, चिंचोळ्या मार्गात एकाच बाजूला सर्व वाहने थांबणे, जेणेकरून सिग्नल सुटल्यावर समोरून येणाऱ्या वाहनांना जागा न मिळणे असे प्रसंग नित्याचे असतात. उपायोजना करताना वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्या समन्वयाने आय.टी.एम.एस. तंत्रज्ञान आधारित सिग्नल यंत्रणा नवी मुंबईत उभी करण्याची संकल्पना समोर आली. त्यावर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता शिरीष आरदवाड, विद्युत कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी कामाला सुरुवात केली. ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणार आहे. वाहतूक पाहून वेळ कमी-अधिक करणे, अत्यावश्यक वाहने दिसताच वाट करून देणे अशी अनेक काम स्वयंचलित होणार आहेत. या यंत्रणेचा मुख्य ॲक्सेस हा महापालिका आणि पोलिसांनाही असणार आहे. त्यामुळे सिग्नल परिसरात कुठेही अपघात झाला तर वाहतूक पोलीस, तात्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करू शकणार आहेत.
प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थेबाबत वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत नेमके काय हवे याबाबत स्पष्टता ठेवली. त्याला अनुसरून ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ तत्वावर हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी सांगितले.
- ‘यंत्रणा कशी राबणार?
सिग्नल वरील अत्याधुनिक कॅमेरे आपत्कालीन गाडी ओळखून त्या मार्गावरील गाड्या हिरवा दिवा लावून तात्काळ सोडतील. त्याचवेळी अन्य सिग्नलवर लाल दिवा लावला जाईल. एखाद्या सिग्नल वर ठराविक मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात गाड्या थांबलेल्या असतात तर दुसरीकडे गाड्या सर्व निघून जातात मात्र केवळ त्या ठिकाणी हिरवा सिग्नल असल्याने अन्य ठिकाणच्या गाड्यांना थांबणे भाग पडते अशा वेळी ही यंत्रणा ज्या ठिकाणी अधिक गाड्या आहेत त्या मार्गिकेला हिरवा सिग्नल देईल. वाहतूक पाहून सिग्नलची वेळ कमी-जास्त करणारी स्वयंचलित यंत्रणा आहे. त्यामुळे जवळ जवळ असणाऱ्या दोन सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही. ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणार आहे. वाहतूक पाहून वेळ कमी-अधिक करणे, अत्यावश्यक वाहने दिसताच वाट करून देणे अशी अनेक काम स्वयंचलित होणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai