खारघरमधील सेंट्रल पार्कची दुरवस्था
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 62
खारघर ः खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उद्यान असून विद्यार्थ्यांप्रमाणेच पर्यटकांची नेहमीच तेथे वर्दळ असते. मात्र सद्यस्थितीत या उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली असून खेळणी मोडकळीस आली आहे. नाताळ सण तोंडावर आला असून सुट्टीमध्ये येथे मोठ्या प्रमाणात बच्चे कंपनी येते. तत्पुर्वी सिडकोने तात्काळ खेळणी दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडकोने लंडनमधील हाईड पार्कच्या धर्तीवर खारघर मध्ये सेंट्रल पार्क उद्यान उभारले आहेत. उद्यानात भारतीय संस्कृतीची ओळख होईल अशाप्रकारे उद्यानाची रचना करण्यात आली आहे. उद्यानाच्या सुरुवातीलाच पखवाज, पेटी आणि इतर वाद्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. तसेच कारंजे बसविण्यात आले होते. भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम आणि इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी अशाप्रकारचे थीम पार्क तयार केले होते. तर एका बाजुला चिल्ड्रन पार्क उभारुन विविध प्रकारच्या खेळणी उपलब्ध करुन दिल्या होत्या.
मात्र, गेल्या 5 वर्षात सिडकोने सेंट्रल पार्ककडे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण सेंट्रल पार्कची दुरवस्था झाली आहे. चिल्ड्रन पार्कमधील खेळणी मोडकळीस आली आहे. तलावामधील आणि आतमधील कारंजे बंद आहेत. ढोलकी, तबला यांच्या प्रतिकृतींची तोडफोड झाली आहे. नृत्याची माहिती देण्यासाठी उभारलेल्या कलाकारांच्या पुतळे गायब झाले असून ॲम्पी थिएटरचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडत असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात आता 15 दिवसानी नाताळ सणामुळे शाळांना सुट्टी पडणार आहे. सिडको प्रशासनाने चिल्ड्रन पार्क मधील खेळणी तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सेंट्रल पार्क विकसित केला जाणार असून लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai