डोंगररांगांना नो-डेव्हलपमेंट झोन घोषित करा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 61
पर्यावरणप्रेमींची मागणी
नवी मुंबई ः गायब होणाऱ्या टेकड्या वाचवा हा संदेश समाजातील सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने खारघर वेटलँड्स अँड हिल्स ग्रुप, अनुभूती 365 डेज आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन, वन विभाग-पनवेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील टेकड्या वाचविण्यासाठी पर्वत दिन मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विशेषकरून पांडवकडा धबधब्यांचे संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक मोहीम आणि चढावावर सायकल रॅली हे दोन उपक्रम दि.11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत.
या मोहिमेची या वर्षीची जागतिक थीम पाणी, अन्न आणि उपजीविकेला आधार देण्यात हिमनद्यांची भूमिका अधोरेखित करते. सध्यस्थितीत नवी मुंबई मोठी चिंता पर्वतांवरील टेकड्यांचे धोक्यात आलेले अस्तित्व हे आहे. अनियंत्रित उत्खनन, सपाटीकरण आणि रिअल-इस्टेट योजना आदी कारणांमुळे नैसर्गिक टेकड्यां गिळंकृत होत आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार म्हणाले की, सर्वत्र पर्वतांना संरक्षणाची आवश्यकता असताना, नवी मुंबईला प्रथम स्वतःच्या नाजूक टेकड्या वाचवाव्या लागतील. पुढील नुकसान टाळण्यासाठी सर्व स्थानिक डोंगररांगांना कडक नो-डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.
खारघर वेटलॅड्स अँड हिल्स फोरमच्या संयोजक ज्योती नाडकर्णी यांनी पांडव कडा धबधब्याचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दि.11 डिसेंबर रोजीच्या या कार्यक्रमात स्थानिक डोंगरांच्या जैवविविधतेवर जागरूकता सत्र, खारघर पर्वतरांगांवर छायाचित्र प्रदर्शन आणि पांडव कडा पुनर्संचयित करण्यासाठी आणि लॅडस्केपचे संरक्षण करण्यासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. तर रविवार, दि.14 डिसेंबर रोजी आयोजित दुसऱ्या उपक्रमा अंतर्गत उत्सव चौक ते फणसवाडी पर्यंत एक चढाई सायकलिंग रॅलीचे आयोजन सकाळी 7.30 वाजता करण्यात येणार आहे. ज्ञानमगंगा चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्या टँडम सायकलसह यावेळी या मोहिमेत सामील होतील. यात एक दृष्टिहीन सायकलस्वार स्वार असेल. डोंगराळ परिसंस्थेशी जोडलेल्या पारंपारिक पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी हे सायकल स्वार आदिवासी कुटुंबांना देखील भेटणार आहेत. अनुभूती365 डेजचे संचालक सुदीप आठवले यांनी, आपल्याला खरोखर पृथ्वीचे रक्षण करायचे असेल तर पर्वतांचे रक्षण करण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे गरजेचे असल्याचे त्यांनी नमुद केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai