दुबार मतदार शोधण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2025
- 109
नवी मुंबई ः महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने मतदार यादीतील दुबार मतदार शोधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेसोबत पालिकेचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.
दुबार मतदार शोधण्यासाठी संगणक प्रणाली तयार केली असून दुबार मतदारांच्या नावानुसार, विधानसभा यादी भाग याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे.दुबार मतदारांचे फोटो असलेली मतदार यादी सदर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे देण्यात आलेली आहे. त्यांचेमार्फत दुबार मतदार पडताळणी करून मार्क कॉपी मध्ये नोंद करण्यात येणार आहे व त्यास अनुसरून सदर मतदार एकाच ठिकाणी मतदान करेल याची खात्री करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका मतदार यादीत नाव शोधणे सोपे जावे याकरिता हीींंीि://ारहरीशर्लेीींंशीश्रळीीं.ळप/ या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्यामुळे मतदारांना आपले नाव व क्रमांक शोधणे सुलभ व सोपे झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही नाव आणि मतदार क्रमांक शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय सर्व विभाग कार्यालयांमध्ये मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. तरी नवी मुंबईकर मतदार नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि मतदार यादीतील आपले नाव व क्रमांक याची माहिती ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून हातातील मोबाईलच्या एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai