स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीमा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2025
- 97
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रात नियमीत करण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या जोडीला हवेतील धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून हमरस्ते, अंतर्गत भागातील मुख्य रस्ते तसेच एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवरील माती ब्रशने गोळा करून प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून घेण्याची कार्यवाही मागील 20 दिवसांपासून करण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर 8 एल मार्केट ते मानक हॉस्पिटल या वर्दळीच्या रस्त्यावर सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच सेक्टर 11 ते 15 परिसरातही सखोल स्वच्छता करण्यात आली. तुर्भे विभागात सेक्टर 10 सानपाडा येथे डी मार्ट परिसरात आणि बेलापूर सेक्टर 15 परिसरातही सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. ऐरोली विभागात सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयातील एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांसोबत सेक्टर 10 ते 14 खाडीकिनारा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुंबई काटई ब्रिजखाली स्वच्छता शपथ घेऊन सुरू झालेल्या या मोहीमेमध्ये 28 गोणी कचरा संकलित करण्यात आला व तो लगेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
या स्वच्छता मोहीमांप्रमाणेच जुईनगर येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या ठिकाणी स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांनी जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले व त्याविषयी माहिती दिली. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम सांगून प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहनही करण्यात आले. याशिवाय ऐरोली सेक्टर 14 कार्यक्षेत्रात मागील आठवड्यापासून प्रवीण गांधी विधी महाविद्यालय विलेपार्ले यांच्या विद्यार्थी स्वयंसेवकांमार्फत सोसायट्यांमध्ये जाऊन कचरा वर्गीकरण व प्लास्टिक प्रतिबंधाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच त्या परिसरात फिरणाऱ्या ‘टो-गो’ या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या विशेष वाहनाची माहिती देऊन नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे. या विद्यार्थी स्वंयसेवकांना त्या भागातील महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai