सिडकोची घरे 10 टक्क्यांनी स्वस्त
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2025
- 81
19,000 हजार घरांची महागृहनिर्माण योजना 14 डिसेंबर 2025 रोजी जाहिर
नवी मुंबई ः माझे पसंतीचे सिडकोचे घर या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती सिडकोने भरमसाठ ठेवल्याने त्या कमी करण्याची मागणीने जोर धरला होता. अखेर या घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी स्वस्त करण्याची घोषणा शासनाने केली आहे. यामुळे सिडकोच्या ईडब्युएसआणि एलआयजीच्या 17 हजार घरांच्या किमंती कमी होणार आहेत. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे महत्वपूर्ण नोड्समध्ये 19,000 घरांची महागृहनिर्माण योजना जाहिर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक नागरिकांनी संबधित संकेतस्थळास भेट द्यावी.
शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं नवी मुंबईतील 26500 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती. या योजनेसाठी बुकिंग शुल्क भरणाऱ्यांची संख्या देखील 26000 हा आकडा पार करु शकला नव्हता. म्हणजेच सिडकोनं जितक्या घरांच्या विक्रीसाठी मागवले तितके देखील अर्ज आले नव्हते. प्रत्यक्ष बुकिंग शुल्क भरणाऱ्या अर्जदारांची संख्या 21399 इतकी होती. 19 फेब्रुवारी 2025 ला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये 19518 अर्जदारांना घरं लागली. सिडकोनं उरलेल्या 1881 अर्जदारांना देखील घरं देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातील काही जणांनी किमंती अव्वाच्या सव्वा असल्याने घरं नाकारण्याची भूमिका घेतली होती. या घरांच्या किमंती कमी व्हाव्यात यासाठी लाभार्थ्यांनी, विविध राजकीय पक्षांनी व लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता. पावसाळी अधिवेशनात तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा मांडला होता. अनेक बैठका यासंदर्भात झाल्या. अखेर 14 डिसेंबरला शासनाने घरांच्या किंती 10 टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा केली. यामुळे लाभार्थ्यांनी दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत (सरेंडर) केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदती दरम्यान संबंधित अर्जदारांना हीींंीि://लळवलेहेाशी.लेा या संकेतस्थळाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
त्याचप्रमाणे सिडकोने नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगर, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्वपूर्ण नोड्समध्ये 19,000 घरांची महागृहनिर्माण योजना दि.14 डिसेंबर 2025 रोजी जाहिर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक नागरिकांनी संकेतस्थळास भेट द्यावी.
सिडकोच्या घरांच्या किंमतींमध्ये 10 टक्के कपात करण्याचा शासनातर्फे घेण्यात आलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या घराच्या स्वप्नाला बळ देणारा असून, सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लाखो अर्जदारांना मोठा दिलासा देणारा आहे. जे नागरिक नवी मुंबईत घर घेण्यास इच्छुक आहेत, त्या नागरिकांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. जागतिक दर्जाच्या नवी मुंबई शहरात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे स्वतःचे घर असावे, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
सिडकोच्या घरांच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय हा सर्वसमावेशक व परवडणाऱ्या गृहनिर्माण उद्दिष्टांशी सुसंगत आहे.यामुळे सर्व अर्जदारांना घर स्वस्तात मिळवण्याची पुनःश्च सुवर्णसंधी मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ‘सर्वांसाठी घरे ‘या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत (दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी प्रारंभ) बामणडोंगरी, कळंबोली, खारकोपर, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल, वाशी व तळोजा या सर्व नोडमधील घरांच्या किंमती देखील 10% नी स्वस्त झाल्या आहेत. ही सुधारित किंमत विद्यमान लाभार्थी तसेच भावी अर्जदार दोघांनाही लागू राहणार आहेत. -विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai