व्हॅली गोल्फ कोर्समध्ये रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2025
- 70
रु. 1 कोटीचे पारितोषिक; नामांकित गोल्फपटूंचा सहभाग
नवी मुंबई ः सिडको आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) यांनी संयुक्तरीत्या लार्सन ॲण्ड टुब्रो प्रस्तुत सिडको ओपन 2025 च्या उद्घाटनाच्या सामन्याची घोषणा केली. या गोल्फ सामन्यांकरिता रु. 1 कोटीचे पारितोषिक ठेवण्यात आले असून दि.16 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये नवी मुंबईतील भव्य खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे हे सामने पार पडणार आहेत.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) हे या सामन्यांचे आयोजक असून लार्सन ॲण्ड टुब्रो हे सादरकर्ते भागीदार (प्रेझेंटिंग पार्टनर) आहेत. या सामन्यांमध्ये 126 व्यावसायिक खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येकी 18 होल्सकरिता स्ट्रोक-प्ले पद्धतीने चार फेऱ्यांमध्ये सामने खेळविले जाणार आहेत. दोन फेऱ्यांनंतर टॉप 50 खेळाडूंची निवड करण्यात येईल. गोल्फ कोर्सकरिता 72 पार आहे. या सामन्यांमध्ये युवराज संधू, अर्जनु प्रसाद, मनु गंडास, अंगद चीमा, खालिन जोशी आणि ओम प्रकाश चौहान यांसारखे नामांकित भारतीय व्यावसायिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
झेक प्रजासत्ताक येथील स्टेपन डानेक, इटली येथील मायकेल ओर्टोलानी व फेडेरिको झुकेट्टी, अमेरिकेतील कोईचिरो सातो, श्रीलंकेतील एन थंगराजा व के प्रबागरन, बांगलादेश येथील जमाल हुसैन, एमडी सिद्दीकुर रहमान, बादल हुसैन, नेपाळ येथील सुभाष तमांग आणि युगांडा येथील जोशुआ सील हे नामांकित परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. स्थानिक गोल्फपटूंमध्ये नवी मुंबईतील मनोज कुमार, मयूर ठाकूर आणि पंकज ठाकूर तर मुंबईतील बजरंग माने यांचा समावेश असणार आहे.
सिडको ओपन 2025 या आंतरराष्ट्रीय गोल्फ सामन्यांचे आयोजन हा सिडकोसाठी अभिमानाचा क्षण असून उदयोन्मुख खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासह गोल्फला प्रोत्साहन देणे हा या सामन्यांच्या आयोजनाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यात आलेल्या 18 होल्सच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथ प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित सामन्यांच्या आयोजनाकरिता सिडकोला ज्यांचे सहकार्य लाभले त्या भागीदारांना आणि प्रायोजकांना मी धन्यवाद देतो. या सामन्यांद्वारे भविष्यातील गोल्फ चॅम्पियनकरिता जागतिक दर्जाच्या सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या सामन्यांमधील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंना समर्पित भावनेने आपले उद्दिष्ट साध्य करण्यास प्रेरणा मिळणार आहे. -विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नवी मुंबईतील खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे प्रथमच पीजीटीआय सामन्यांचे आयोजन करण्याचा आम्हाला आनंद होत आहे. सदर गोल्फ कोर्स हे देशातील गोल्फसंबंधित विस्तारणाऱ्या सोयी सुविधांचे निदर्शक असून नवीन प्रदेशांत आणि समूहांपर्यंत गोल्फ पोहोचविण्याकरिता हे सामने महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. जगातील आर्थिक केंद्रे असणाऱ्या शहरांमध्ये खेळला जाणार हा खेळ असून देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये पीजीटीआय सामन्यांचे आयोजन करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. या निसर्गरम्य गोल्फ कोर्सवर देशातील उत्तम प्रतीच्या गोल्फपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार असून यामुळे नवी मुंबई आणि इतर प्रदेशांतील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे. या सामन्यांच्या आयोजनासाठी लाभलेल्या सहकार्याकरिता आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडको आणि लार्सन ॲण्ड टुब्रो यांचे आभारी आहोत. कपिल देव अध्यक्ष, पीजीटीआय
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai