विमानतळावरील तिसऱ्या धावपट्टीसाठी कार्यवाही
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2025
- 76
सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
नवी मुंबई ः आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या समांतर धावपट्टीच्या विकासासाठी सविस्तर तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास करण्याकरिता सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. या अभ्यासासाठी नामांकित व पात्र स्वतंत्र संस्था तसेच संयुक्त उपक्रम/संघटनांकडून निविदा मागविण्यासाठी प्रस्ताव मागणी तयार करण्यात आली आहे.
सध्या मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाला मुख्यत्वे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा देत असून, त्याची प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे 50 ते 55 दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष इतकी मर्यादित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर, मुंबई व नवी मुंबई येथील विमानतळांद्वारे सुमारे 150 चझझअ क्षमतेची नियोजित बहुविमानतळ व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. यामध्ये उडचखअ ची क्षमता 50- 55 चझझअ तर छचखअ ची क्षमता 90-95 चझझअ इतकी असेल. छचखअ चे आगामी विस्तार टप्पे आणि उडचखअ येथील क्षमतेत वाढ यांद्वारे मध्यम कालावधीतील वाढती मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी 2037 नंतरच्या दीर्घकालीन हवाई वाहतूक मागणीसाठी छचखअ वरील तिसऱ्या धावपट्टीसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येत आहे.
सुमारे 1,160 हेक्टर क्षेत्रावर विकसित होत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याच्या क्षमतेसह नियोजित आहे. या विमानतळावर एकाच वेळी स्वतंत्रपणे कार्य करू शकणाऱ्या दोन समांतर धावपट्ट्या तसेच परस्पर जोडलेल्या चार प्रवासी टर्मिनल्सची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये टर्मिनल-1 ची क्षमता 20 चझझअ, टर्मिनल-2 ची 30 चझझअ, तर टर्मिनल-3 आणि टर्मिनल-4 प्रत्येकी 20 चझझअ इतकी आहे. त्यामुळे एकूण टर्मिनल क्षमता 90 चझझअ इतकी आहे. हे विमानतळ पाच टप्प्यांत विकसित करण्यात येत असून, पहिला व दुसरा टप्पा 25 डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाणांच्या प्रारंभासाठी सज्ज आहे. पुढील टप्प्यांमध्ये 2029 पर्यंत क्षमता 50 चझझअ, 2032 पर्यंत 70 चझझअ आणि 2037 पर्यंत 90 चझझअ इतकी वाढविण्यात येणार आहे.
ही पायरी सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा नियोजनाची साक्ष देणारी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास हा परिसराच्या दीर्घकालीन वाढीच्या आणि विकासाच्या गरजांशी सुसंगतपणे सुरू राहील, याची खात्री यामुळे होणार आहे.- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai