प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2025
- 107
नवी मुंबई ः राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. 15 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, संबंधित विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच नवी मुंबई महापालिकेच्या संकेत स्थळावर आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीकरिता मतदार यादीची प्रत (अंतिम मतदार यादी) (फोटोसह) प्रतिपृष्ठ रु. 2/- इतका दर आकारून उपलब्ध करून देता येईल. तसेच मतदारांकरीता नाव शोधण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai