मोतीलाल झुंजुनवाला महाविद्यालयात आविष्कार संशोधन कार्यशाळा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2025
- 95
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती दृढ व्हावी तसेच मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये अधिकाधिक सहभाग वाढावा या उद्देशाने वाशीतील आईसीएलईएस मोतीलाल झुंजुनवाला महाविद्यालयात भव्य संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 24 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांनी झोन-4 मध्ये पात्रता मिळवून मुंबई विद्यापीठाच्या पुढील पातळीवर प्रवेश मिळवला आहे.
कार्यशाळेची रचना शिक्षक व विद्यार्थी या दोन घटकांवर केंद्रित ठेवून करण्यात आली होती. मुख्य सत्रात प्राचार्या डॉ.गोस्वामी-गिरी यांनी संशोधनातील नावीन्य, स्वतंत्र विचारसरणी, शैक्षणिक काटेकोरता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांवर परिणामकारक मांडणी केली. निरीक्षण, विश्लेषण, प्रयोग, संकल्पनात्मक रचना आणि प्रभावी सादरीकरण ही संशोधनाची मूलतत्त्वे विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. हेमा डावरे यांनी अविष्कार संमेलनातील नियमावली, मूल्यांकन निकष, तसेच विविध श्रेणींबाबत सुस्पष्ट माहिती दिली.
या कार्यशाळेत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधून एकूण 83 विद्यार्थ्यांनी 24 संशोधन प्रकल्प सादर केले. सामाजिक भान, पर्यावरण संवर्धन, विज्ञान-तंत्रज्ञान, एआय आधारित मॉडेल्स, जैवविविधता, तसेच प्रयोगाधारित अभ्यास अशा विविध विषयांवरील प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधले. संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन व समन्वय महाविद्यालयीन समन्वयक सरोज माहुलकर यांनी पार पाडले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai