निवडणुकीसाठी पालिका सज्ज
- by मोना माळी-सणस
- Dec 17, 2025
- 335
9.5 लाख मतदार; 1141 मतदान केंद्र ; 6275 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता, पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था राखून निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्यादांच चार सदस्य प्रभाग नुसार निवडणुका होणार असल्याने 111 प्रभागांऐवजी 28 प्रभाग असणार आहेत. यासाठी 5600 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली असून सोशल मिडिया तसेच प्रचार-प्रसारातील आचारसहिता भगांच्या घटनांसाठी विशेष पथके, सायबर सेल यांची करडी नजर असणार आहे.
पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेची तयारी, प्रशासकीय उपाययोजना तसेच महापालिका व संबंधित यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार नवी मुंबई महापालिकेतही प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांसह मतदारांनी नियमांचे पालन करुन जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकुण 9 लाख 48 हजार 460 मतदार असून यामध्ये 5 लाख 16 हजार 267 पुरुष तर 4 लाख 32 हजार 040 महिला व इतर 153 मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्र.1 मध्ये सर्वाधिक 40 हजार 198 मतदार आहेत तर शेवटच्या 28 नंबरच्या प्रभागात सर्वात कमी 26 हजार 798 मतदार आहेत. अंतिम यादी जाहीर झाली असून 45155 दुबार नावे आहेत. एकुण 28 प्रभाग असून 27 प्रभागात 4 सदस्य तर एका प्रभागात त्रिसदस्यीय मतदान होणार आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी पालिकेने तयारी केली असून यात 1141 मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर 700 ते 800 मतदान होणार आहे. 8 निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्याद्वारे निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे. 14 गावांचा नव्याने समावेश झाल्याने तेथील 15000 मतदार नवी मुंबई महापालिकेसाठी मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी 1500 मतदान केंद्र असणार आहेत. त्याचेही नियोजन पालिका करणार आहे.
निवडणुक प्रक्रिया सुकर पार पडण्यासाठी 5600 प्रत्यक्ष तर राखीव धरुन 6275 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे सहाय्य घेण्यात येण्ाार आहे. प्रत्येक उमेदवारास 11 लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. निवडणुक प्रचारावर पालिका व पोलीस यांच्या संयुक्तपणे स्थापन केलेल्या सायबर सेलचे लक्ष राहणार आहे. 4 स्थिर पथके व काही भरारी पथके असणार आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळल्यास त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट करतानाच ऑडिओद्वारे चार प्रभागांसाठी कसे मतदार करायचे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया राबविण्यात येतील, असेही आयुक्तांनी नमूद केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस