शिरवणे विद्यालयात एआय लॅबचे उद्घाटन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 17, 2025
- 197
नवी मुंबई ः शिरवणे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, नेरूळ येथे लर्निंग लिंक्स फाउंडेशनद्वारे शेल एनएक्सप्लोरर्स सेंटर ऑफ एक्सलन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या विद्यालयाने सादर केलेल्या प्रकल्पाला आयआयटी बॉम्बे टेकफेस्ट आशियातील सर्वात मोठा तंत्रज्ञान महोत्सव येथे द्वितीय क्रमांक मिळाला. या यशाच्या परिणामी संस्थेमध्ये अत्याधुनिक एनएक्सप्लोरर्स लॅब स्थापन करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन बीजीईपीआयएल आणि जीएम शेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निपुण प्रधान व शिरवणे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, “शेल लर्निंग लिंक्स फाउंडेशन, शेल एनएक्सप्लोरर या एनजीओंनी शिरवणे विद्यालयात एआय लॅबचे उद्घाटन केले. आपली शाळा ही कमी उत्पन्न गटातून येणाऱ्या मुलांची शाळा आहे. या शाळेत अशाप्रकारची लॅब सेट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या लॅबच्या माध्यमातून 6वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि प्राचार्या मॅडमचे त्यांनी कौतुक केले. तसेच “शेल कंपनीच्या माध्यमातून आमच्या मुलांना नारळाच्या पाण्यापासून लेदर बनवण्याचा प्रोजेक्ट बेंगलोरला जाऊन सादर करण्याची संधी मिळाली. ज्यात आशिया खंडातील विविध 11 देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात शिरवणे विद्यालयाच्या मुलांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून शेल संस्थेने लॅब सेट करून दिली. जेणेकरून त्यांना शिकण्याची संधी मिळेल व येथून वैज्ञानिकही घडू शकतील, असे यावेळी प्राचार्या भाग्यश्री चौधरी यांनी सांगितले. याप्रसंगी कार्पोरेट रिलेशन्स पॉलिसी आणि गव्हर्नमेंट रिलेशन्स इंटिग्रेटेड आणि शेल एनर्जीचे विकास तुलसीयान, लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या पार्टनर सौ दीपिका शर्मा, शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या भाग्यश्री चौधरी तसेच शिक्षक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai