उबाठा आणि काँग्रेसच्या नेत्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 18, 2025
- 116
नवी मुंबई ः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या उबाठा आणि काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या पदावरील नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटासह काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे नवी मुंबईत पाहायला मिळाले. ठाण्यातील कार्यक्रमात उबाठा गटाचे नवी मुंबईत पक्षाचे नेतृत्व करणारे मनोहर मढवी (एम.के) तर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष पुनम पाटील यांनी (शिंदे गट) पक्ष प्रवेश केला. यामुळे नवी मुंबईत या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिंदेची शिवसेना विरुद्ध वन मंत्री गणेश नाईक असा सामना रंगला आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यातूनच दोन्ही नेत्यांकडून इतर पक्षातील नगरसेवकांना गळा लावून पक्षात घेण्याची मालिका रंगली आहे. असे असतानाच, सोमवारी नवी मुंबई महापालिकेची निवडणुक जाहीर होताच, दुसऱ्या दिवशी शिंदेच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या तीन तर काँग्रेसच्या दोन अशा एकूण पाच नगरसेवकांना पक्ष प्रवेश देऊन ठाकरे गटासह काँग्रेसला मोठा धक्का दिला. ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यादरम्यान, नवी मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक मनोहर मढवी (एम.के), विनया मढवी, करण मढवी तर बेलापूर विभागातील राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम मिथुन पाटील या पाच नगरसेवकांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.
नवी मुंबईतील ऐरोली भागातून मनोहर मढवी (एम.के), विनया मढवी, करण मढवी आणि चेतन नाईक हे चार नगरसेवक निवडून येतात. एम.के.मढवी हे नवी मुंबई महापालिकेत सलग चार वेळा निवडून गेले होते. शिवसेनेतही फुट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. या काळात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, त्यांना तडीपारही करण्यात आले. त्यानंतरही त्यांनी उद्धव यांची साथ सोडली नाही. त्याची बक्षीशी म्हणून त्यांना ऐरोली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai