नोकरदार महिलांना लैंगिक छळ कायद्याविषयी मार्गदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 102
सिडकोतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नवीमुंबई ः महिलांसोबत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व तक्रार निवारण) अधिनियम, 2013 अर्थात पॉश कायदा याविषयी सिडकोतर्फे सर्व कर्मचाऱ्यांसाठी 19 डिसेंबर 2025 रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सिडकोच्या विशाखा समितीमार्फत राबविण्यात आला. कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानजनक व सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूया महिला संघटनेच्या अध्यक्षा नीलम पालव यांनी या कायद्याच्या विविध तरतुदींची सविस्तर माहिती दिली. लैंगिक छळाची व्याख्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियोक्ता व कर्मचाऱ्यांची जबाबदारी, तसेच कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेली तक्रार निवारण प्रक्रिया याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अंतर्गत तक्रार समितीची भूमिका, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया व गोपनीयतेचे महत्त्व यावरही त्यांनी विशेष भर दिला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदविला. यामुळे विषयावर सखोल, सकारात्मक व उपयुक्त चर्चा घडून आली आणि कर्मचाऱ्यांचे सदर कायद्याविषयीचे ज्ञान अधिक दृढ झाले.
या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून सिडकोने महिलांसोबत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व तक्रार निवारण) अधिनियम, 2013 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक व छळमुक्त कार्यस्थळ सुनिश्चित करण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. या कार्यक्रमाला सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देखमुख तसेच मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे उपस्थित होते. यावेळी विशाखा समितीच्या अध्यक्षा गीता पिल्लई तसेच समितीचे सदस्यही उपस्थित होते. त्याचप्रमाणे सिडकोचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai