नवी मुंबई काँग्रेसची धुरा आता रामचंद्र दळवींवर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 114
नवी मुंबई ः दहा वर्षांनी महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यंदा निवडणूक होण्याची खात्री असल्याने प्रत्येक पक्षाने पक्ष बांधणी जोरात सुरु केली होती. मात्र कट्टर काँग्रेस विचारधारेचे पाईक म्हणून शहरात ओळख असलेले मिथुन पाटील यांच्या पत्नी पूनम पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या समवेत काँग्रेसचे माजी नगरसेवक अंकुश सोनावणे यांनीही शिंदे गटात उडी मारली. त्यानंतर काँग्रेसने तातडीने माजी परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी यांची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
महिनाभरापुर्वीच पूनम पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली होती. मात्र निवडणुका जाहीर होताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. पूनम यांच्या पक्षांतरमुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदी आबा दळवी यांची तडकाफडकी निवड करण्यात आली. अध्यक्ष पदावर असताना अन्य पक्षात प्रवेश करणारे अध्यक्ष म्हणून पूनम पाटील या पहिल्या नाहीत तर यापूर्वी अनिल कौशिक आणि दशरथ भगत यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला होता. दशरथ भगत यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढल्याने त्यांना पदावरून हटवले गेले आणि त्यांनीही लगेच भाजप मध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी यांची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने पक्षाची भूमिका सांगण्यासाठी बेलापूर येथील एलोरा कॅसलं सोसायटीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मुख्य समन्व्यक संतोष शेट्टी, नवी मुंबई प्रभारी डॉ. मोनिका अग्रवाल, वरिष्ठ नेते रविंद्र सावंत, नवी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा उज्वला साळवे, दत्ता माने, प्रा. रत्नाकर कुदळे, रमेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रामचंद्र (आबा) दळवी यांनी सांगितले की, नवी मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात काँग्रेसला दुर्लक्षित करून कोणालाही सत्तेवर येता येणार नाही. आजही काँग्रेस पक्षाचे संघटन इथं मजबूत असून महाविकास आघाडीतील सहकार्यासह प्रहार आणि वंचित पक्षाना सोबत घेऊन आगामी निवडणुकीस सामोरे जाऊ. स्थानिक पातळीवर निवडणुकीचे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हास दिले आहेत.
2015 मध्ये काँग्रेसचे दहा नगरसेवक होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी पक्ष असल्याने त्यांचा सहभागात सत्तेत होता. उपमहापौर पदी अविनाश लाड आणि अडीच वर्षांनी मंदाकिनी म्हात्रे यांची वर्णी लागली होती. मात्र त्यावेळी असणाऱ्या सर्वच नगरसेवकांनी काँग्रेसला पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने त्यावेळचा राजकीय भाषेत स्टँडिंग एकही नगरसेवक उरला नाही. त्यामुळे आता नवी मुंबईत सर्व परिचित असलेला चेहरा शोधणे कठीण झाल्याची खंत जुने काँग्रेसी कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai