आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीसाठी कक्ष स्थापन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 23, 2025
- 82
नवी मुंबई ः महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक विषयक विविध कामांकरिता नवी मुंबई महापालिकेतील विभागप्रमुख दर्जाचे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) नियुक्त केले आहेत.
निवडणूक काळात पारदर्शकता व शांतता अबाधित राहण्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता हा अतिशय महत्वाचा विषय असून त्याकरिता आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात येऊन त्याचे सनियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त (1) सुनिल पवार यांचेकडे जबाबदारी सोपविलेली आहे. या कक्षामार्फत आदर्श आचारसंहितेचे पालन होणेबाबत निरीक्षण व नियंत्रण तसेच याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी/निवेदनांवर नियमोचित कार्यवाही करण्यात येत आहे. यासोबतच आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने नागरिकांना आपल्या तक्रारी/आक्षेप दाखल करता यावेत याकरिता संपर्कध्वनी क्रमांक जाहीर करण्यात येत असून खालीलप्रमाणे नमूद सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (2) यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येत आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आठ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये सुरु झाली असून त्या प्रत्येक कार्यालयासाठी पहिल्या टप्प्यात तीन आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक व व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक कार्यरत होत आहेत. यासोबतच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्हिडीओ पाहणी पथकेही कार्यरत असणार आहेत. या पथकांव्दारे मतदारांना लाच देणे, वस्तूंचे-पैशाचे मद्याचे वाटप करणे अथवा इतर प्रलोभन दाखवणे, धाकदपटशा दाखविणे आदी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. धार्मिक वा सामाजिक तणाव, प्रतिस्पर्धांवरील विपर्यास्त टिका, प्रार्थनास्थळांचा वापर, घोषणा व जाहीराती, कार्यक्रमांचे आयोजन अशा आचारसंहिता विषयक विविध बाबींवर या पथकांचे बारीक लक्ष असणार आहे तसेच त्याचे व्हिडीओ छायाचित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या सनियंत्रणाखाली मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ. अमोल पालवे या सनियंत्रण कामात समन्वय अधिकारी असणार आहेत. तसेच परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर हे आचारसंहितेच्या विविध पथकांचे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नागरिकांनी आवश्यकतेनुसार टोल फ्री क्रमांकचा वापर करावा व नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात येत आहे.
विभाग कार्यालयाचे नाव सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (2) संपर्क क्रमांक
बेलापूर प्रशांत नेरकर 022-27580610/022-27573826
नेरुळ अनुराधा बाबर 022-27707669
वाशी सुखदेव येडवे 022-27655370 /022-27659741
तुर्भे सागर मोरे 022-27754061 /022-27834069
कोपरखैरणे भरत धांडे 022-27542406 /022-27542449
घणसोली वसंत मुंडावरे 022-27692489 /022-27698175
ऐरोली नैनेश बदले 022-27792114
दिघा ऐश्वर्या नाईक 136544027 /9136544028
मुख्यालय संजय तडवी 022-27567368
टोल फ्री क्रमांक 1800 222 309 /1800 222 310
तरी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आदर्श आचारसंहितेतंर्गत पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडणेच्या दृष्टीने वरील क्रमांकावर आपली तक्रार नोंदवून नागरिकांनी जबाबदार व जागरुक भुमिका घ्यावी आणि निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष व लोकशाही मूल्यानुरुप पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai