अजित पवार गटाच्या नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 60
नवी मुंबई मनपात भाजपचे खाते उघडणारा पहिला नगरसेवक असणारे भरत जाधव यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नवी मुंबई अध्यक्षपदाची माळ पडली आहे. गेल्या काही महिन्यापासून ते भाजप पासून दूर गेले होते. तर नामदेव भगत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने रिक्त झालेल्या पदावर जाधव यांची वर्णी लागली आहे.
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्या जागी भाजप पासून दूर झालेले भरत जाधव यांची वर्णी लागली आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या रूपाने अगोदर शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना 2005 मध्ये भरत जाधव यांच्या रूपाने पहिला नगरसेवक भाजपचा सभागृहात गेला होता. मात्र दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला पुन्हा भाजप वासी झाले. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नामदेव भगत यांच्या जाण्याने रिक्त झालेले अध्यक्षपदी जाधव यांना संधी दिली.
गणेश नाईक यांच्या भाजपात जाण्याने त्यात राष्ट्रवादीची दोन शकले पडल्याने पक्षाचा दबदबा पूर्वीसारखा राहिला नाही. तरीही अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही. अध्यक्ष पद सोडत भगत यांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यावर तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल असे वाटत असतानाच जाधव यांची अध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने जुने कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र अनेकांनी बोलून दाखवले. काँग्रेस अध्यक्ष पूनम पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापूर्वी वडील आणि मुलगी दोन वेगवेगळ्या पक्षाचे काम करत होते आता मात्र एकाच पक्षात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai