उरण रेल्वे मार्गावर नवीन स्थानक कार्यान्वित
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 63
उरण ः 25 डिसेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण सेवा सुरू झाली आहे. या विमानतळावर जाण्याकरिता प्रवाशांना सुलभ व्हावे याकरिता नवे रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहे. बेलापूर-नेरूळ-उरण रेल्वे मार्गावर ‘तारघर’ हे नवे रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्यात आले आहे. हे स्थानक भविष्यात विमानतळ प्रवाशांसाठी प्रमुख रेल्वे मार्ग ठरण्याची शक्यता आहे.
तारघर रेल्वे स्थानक हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असणारे स्थानक आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर या परिसरात प्रवासी, व्यावसायिक वसाहती आणि लोकसंख्येत लक्षणीय वाढ होण्याचा शक्यता आहे. या दृष्टीने विचार करता रेल्वे प्रशासनाने हे स्थानक उभारले आहे.उरण मार्गावरील रेल्वे प्रवासाला या स्थानकामुळे नवे महत्त्व प्राप्त झालं आहे. कामोठे, उलवे, बामणडोंगरी परिसरातील रहिवाशांना थेट रेल्वे सेवेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच बेलापूर-नेरूळ-उरण मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या तारघर स्थानकावर प्रशस्त फलाट, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था असणार आहे. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन स्थानकाचं नियोजन करण्यात आले आहे. हे स्थानक केवळ रेल्वे वाहतुकीपुरते मर्यादित राहणार नसून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत व्यक्त होताना दिसत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai