रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2026
- 35
उरण ः सद्या सुरू असलेल्या रमजाननिमित्त उरण बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. रमजान महिन्यात मुस्लिम धर्मीय (रोजा) उपवास पकडतात आणि सायंकाळी फळांचे सेवन करून इफ्तारी करतात. त्यामुळे या दिवसात फळांची मागणी वाढत असते. यंदा गुरुवारपासून रमजान मासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरण शहरातील बाजारपेठेत फळांची मागणी वाढल्याने आवक देखील वाढली आहे.
रमजान महिन्यात उपवास करताना मुस्लिम धर्मिय दिवसभर पाण्याचा एकही थेंब न पिता उपवास करतात आणि सायंकाळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. उपवास सोडताना यात रसाळ फळे अधिक असतात. त्यामुळे या दिवसात कलिंगड, आंबा, पपई, खरबूज, अननस, चिकू, द्राक्षे, संत्र अशा रसाळ फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे रमजान सणानिमित्त उरण बाजारपेठेत उलाढालही वाढते. उरण बाजारपेठेतील सध्या रसाळ फळांचे दर कलिंगड 100 रु. प्रतिकिलो, चिकू 120 रु. किलो, द्राक्षे 200 रु. किलो, अननस 140 रु. किलो, पपई 70 रु. किलो, खरबूज 100 रु. किलो, संत्र 150 रु. किलो, आंबा 600 रु. किलो याप्रमाणे असून रमजाननिमित्त या फळांना नागरिकांकडून मोठी मागणी आहे.
कलिंगडाला पसंती
सध्या सर्वत्र कडक उन्हाळा आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने शीत पेयांबरोबरच थंड असलेल्या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून उरण बाजारपेठेत कलिंगडाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आठवड्यापासून उरण मधील विविध स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास येऊ लागली. काळे आणि पट्टे असलेले कलिंगड विक्रीकरीता उरण मध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे. 80 रू पासून दोनशे रूपयांपर्यंत नग विकले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिवसभरात 200 ते 300 नगाची विक्री होत असून सट्टीच्या दिवशी हा आकडा 400 पर्यंत जातो अशी माहितीही त्यांनी दिली. एप्रिल आणि मे महिन्यात पारा आणखी चढणार आहे. त्यामुळे कलिंगड फळाला ग्राहकांची पसंती वाढली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai