2165 नामनिर्देशनपत्रांचे वितरण; एकच अर्ज दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 84
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देणे व स्विकारणेची प्रक्रिया 23 डिसेंबर 2025 पासून सुरु झाली आहे. यामध्ये 23 ते 26 डिसेंबरपर्यंत 8 विभागात एकुण 2165 अर्जांचे वितरण करण्यात आले. यापैकी केवळ 1 अर्ज दाखल झाला आहे.
उमेदवार नामनिर्देशन पत्र अर्ज वितरण आणि दाखलची प्रक्रिया गुरुवार 25 डिसेंबर व रविवार 28 डिसेंबर रोजीची सार्वजनिक सुट्टी वगळता 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत व 30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु असणार आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवरांसाठी आवश्यक असलेले नामनिर्देशनपत्र व शपथपत्रांचे अद्ययावत नमुने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती एकत्रितपणे कळावी यादृष्टीने उमेदवारांसाठी विशेष माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून ती सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध ठेवण्यात आली आहे. यामध्ये नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रांचे नमुने आणि इतर नमुने उदा. उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज, निवडणूक प्रतिनिधी व मतदान प्रतिनिधी नेमणूकीचे नमुने, मतपत्रिकेवर नाव छापण्याचा नमुना, पक्षाच्या उमेदवाराने सादर करावयाचे जोडपत्र 1 व जोडपत्र 2 नमुना अशा विविध माहितीचा व नमुन्यांचा अंतर्भाव या माहिती पुस्तिकेमध्ये आहे. त्याचप्रमाणे आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश, अर्हता अनर्हता, प्रभागनिहाय आरक्षणाची आदी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता व नेमून दिलेले प्रभाग, प्रसार माध्यम सनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश अशाही विविध आदेशांचा समावेश या पुस्तिकेमध्ये आहे. रु.100 इतक्या दराने ही उमेदवारांसाठीची माहितीपुस्तिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे.
दि.23 डिसेंबर रोजी आठ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून 1005 नामनिर्देशनपत्रे वितरीत झाली असून दि. 24 डिसेंबर रोजी 618 इतकी नामनिर्देशनपत्रे नेण्यात आली आहेत. दि. 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी असल्याने अर्ज वितरण बंद होते. दि. 26 डिसेंबरला 542 अर्ज वितरण करण्यात आले. असे एकुण 2165 अर्ज वितरीत करण्यात आले. यापैकी कोपरखैरणमधून एक अर्ज दाखल झाला आहे.
- सर्वात जास्त नेरुळमध्ये तर दिघ्यात सर्वात कमी अर्ज वितरण
पालिकेच्या 8 विभागातून एकुण 2165 उमेदवार नामनिर्देशन फत्र अर्ज वितरीत कवण्यात आले यामध्ये बेलापूर विभागातून 291, नेरुळ : 373, वाशी : 214, तुर्भे : 363, कोपरखैरणे : 299, घणसोली : 201, ऐरोली : 235 व दिघा : 189 याप्रमाणे नामनिर्देशनपत्रे वितरण झाले आहे. यामध्ये केवळ कोपरखैरणमधून एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. नेरुळ विभागात सर्वात जास्त तर दिघामध्ये सर्वात कमी अर्ज वितरण झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai