सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पांना पालिकेची नोटीस
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2025
- 68
बांधकाम ‘मानक कार्यप्रणाली’चे उल्लंघन झाल्याने कारवाई
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली रहावी याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. याअंतर्गत पालिकेने सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदुषणाबाबत नोटीस बजावली आहे. यावर उपाययोजना करुन त्ाचा अहवआल सात दिवसात सादर करण्याची सूचना दिली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरीता अवलंबवायची ‘मानक कार्यप्रणाली’ जाहीर करण्यात आली असून बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाबाबतच्या दंडात्मक कारवाईबाबत दि.01/08/2024 रोजी परिपत्रक पारीत करण्यात आले आहे. तसेच, उपरोक्त ध्वनी व वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत उच्च न्यायालयाने दि.28/11/2025 रोजी आदेश पारीत केलेले आहेत. त्यानुसार आयुक्त महोदयांनी नमुंमपा क्षेत्रातील विकासक व वास्तुविशारद यांची विशेष बैठक घेऊन त्यांनी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करावे असे सूचित केले होते. तथापि तुर्भे विभागाचा पाहणी दौरा करीत असतांना जुईनगर रेल्वे स्टेशनलगतचा भूखंड, सेक्टर 11, सानपाडा येथे सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या साईटवर बांधकाम सुरु असतांना वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी संदर्भिय मानक कार्यप्रणालीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशाच प्रकारे भूखंड क्र.1, सेक्टर 19, वाशी येथेही सिडकोमार्फत सुरु असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणीही मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन होत असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यास अनुसरुन सदर भूखंडांवर वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मानक कार्यप्रणालीनुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या उपाययोजनांचा अहवाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागास 7 दिवसांच्या आत सादर करावा अशी नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर न केल्यास बांधकाम स्थगितीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असेही नोटीसीमध्ये सूचित करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai