3800 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 01, 2026
- 58
250 तळीरामांचा समावेश
नवी मुंबई: 31 डिसेंबरच्या रात्री नवी मुंबई परिसरात पोलिसांनी मद्यपी व बेशिस्त वाहन चालकाविरोधात मोहीम राबविली होती. रात्रभर 3800 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 3550 तर मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 250 वाहनचालकांचा समावेश आहे.
नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व आनंदात साजरे व्हावे यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व वाहतूक पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रातील सर्व महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, पोलीस उप आयुक्त - वाहतुक विभाग, सहायक पोलीस आयुक्त-वाहतुक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियम पायदळ तुडवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई केली. पहाटेपर्यंत 250 ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह वाहकांवर कारवाई तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3550 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याने वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे व वाहतुक सुरळित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai