निवडणूकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 01, 2026
- 57
नवी मुंबई ः महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची प्रक्रिया सुरु झाली असून दाखल उमेदवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पार पडली आहे. यापुढील काळात करावयाच्या निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला.
निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व विभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभाग अधिकारी यांना यापुढील कालावधीत करावयाच्या निवडणूकविषयक कामांबाबत मौलिक सूचना केल्या. या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निवडणूक चिन्ह नेमून देणे, अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी, मतपत्रिका छपाई, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण, पहिल्या प्रशिक्षणाच्या दिवशीच त्यांना माहितीपुस्तिका देणे, मतदान अधिकारी यांच्या मतदान केंद्रनिहाय नेमणूका, ईव्हीएम मशिन हाताळणी प्रशिक्षण, मतदान साहित्याची मतदान केंद्रनिहाय उपलब्धता, स्ट्राँग रुम व्यवस्था अशा विविध बाबींबाबत मौलिक मार्गदर्शन केले. सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवार यांना सर्व बाबींची नियमित माहिती देण्याचीही सूचना त्यांनी केली. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी असल्याने त्यासाठी आवश्यक कर्मचारी यांच्या आत्तापासूनच नेमणूका करुन ठेवणे व त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे ही कामे प्राधान्याने करावीत असे सूचित केले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी निवडणूक केंद्र अधिकारीनिहाय आठही विभागांमधील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागातील एकूण मतदान केंद्रे व तेथील व्यवस्था यांची माहिती घेताना तात्पुरत्या स्वरुपात बनविण्यात येणारी मतदान केंद्रे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पडलेला पाऊस पाहता वॉटरप्रुफ करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. ईव्हीएम मशिनची अतिरिक्त व्यवस्था करुन ठेवावी तसेच त्याची हाताळणी प्रशिक्षण मतदान कर्मचाऱ्यांप्रमाणेच राजकीय पक्षप्रतिनिधींनाही दयावे असे सूचित करण्यात आले.
- 100 टक्के मतदानकेंद्रे वेबकास्टींग
सर्व मतदान केंद्रे जीपीएस टॅगींग करावीत तसेच मोठया संख्येने मतदान केंद्रे आहेत अशा ठिकाणची पार्कींग व्यवस्था सक्षम असेल याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवी मुंबईतील सर्व 100 टक्के मतदानकेंद्रे वेबकास्टींग असतील त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना करतानाच मतदान केंद्रांच्या जागा पुरेशा कालावधी आधी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाहीचे निर्देश आयुक्तांनी दिले. आपली सर्वच केंद्रे सीसीटिव्हीच्या निगराणीखाली असून त्यामधील संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताबाबत पोलीस यंत्रणेशी समन्वय राखण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक विभागात मॉडेल पोलींग स्टेशन असतील ती उत्तम करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. - जाहिरातींसाठी समान संधी
जाहिरातींसाठी जागा उपलब्धता तसेच मैदान उपलब्धता याबाबत सर्वांना समान संधी हे तत्व काटेकोरपणे अंगिकारण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. तसेच जाहिरात फलकांवर जिओ टॅगींग पध्दत अंगिकारावी असेही सूचित करण्यात आले. मतदारांना मतदान चिठ्ठ्या वाटण्याचे काम आपल्या बीएलओ यांचेमार्फत सुरू करावे अशाही सूचना देण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai