सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2026
- 38
नवी मुंबई ः मुख्य रस्त्यांप्रमाणेच अंतर्गत भागातही सखोल स्वच्छता मोहीमा राबवून हवा गुणवत्तेच्या दृष्टीने दररोज सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज रविवारच्या दिवशी शहरातील मुख्य वर्दळीच्या सायन पनवेल महामार्गावर वाशी ते बेलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेची साफसफाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते व पदपथ याकडेला साचलेली माती ब्रशने खरवडून काढण्यात आली व संकलित करून हलविण्यात आली तसेच प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून घेण्यात आले. यासाठी जेटींग स्प्रेचा वापर करण्यात आला.
सायन पनवेल महामार्गाप्रमाणेच सेक्टर 17 कोपरखैरणे मुख्य मार्ग, रिलायबल टेक पार्क ऐरोली, गजानन चौक ते शापुरजी पालनजी साईट सेक्टर 6 सानपाडा, जुहूगांव मुख्य रस्ता, शिरवणेगाव अंतर्गत मुख्य रस्ता, जिजामाता नगर घणसेली अशा शहराच्या अंतर्गत भागातील मुख्य रस्त्यांचीही सखोल स्वच्छता करण्यात आली. हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील व रस्त्यांकडेची माती साफ करण्याकरिता या सखोल स्वच्छता मोहीमा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आणि नियमितपणे राबविण्यात येत असून त्यासोबत एनकॅपच्या वाहनांव्दारे हवेत प्रक्रियाकृत पाण्याची कारंज्यासारखी फवारणी करून हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.
त्या अनुषंगाने रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही या सखोल स्वच्छता मोहीमा सायन पनवेल महामार्गावर वाशी ते बेलापूर पर्यंत तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यांवर अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.रविंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या. यामध्ये अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकम मिळून 350 हून अधिक जणांनी सक्रिय सहभाग घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai