प्रतिक दर्णे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2026
- 51
उरण ः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा वैद्यकीय सांस्कृतिक तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता मुक्काम सातीर्जे,पोस्ट मापगाव, तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ नेते भाई जगताप, जेष्ठ नेते जयंत पाटील,ऍड.उमेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रतिक दर्णे यांना प्रदान करण्यात आला. स्वगय आमदार मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्र मंडळ रायगड, ऍड.उमेश ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उरणचे सुपुत्र प्रतिक प्रविण दर्णे (नवीन शेवा )यांनी यापूव अनेक राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय पदके,बक्षीस पटकाविले आहेत. प्रतिक प्रविण दर्णे यांनी यापूव आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन भारताला ब्रांझ पदक मिळवून दिले आहे.त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले असून 2025 मध्ये द्रोणागिरी भूषण तर आता नुकताच कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. प्रतिक प्रविण दर्णे यांची प्रतिष्ठित समजला जाणारा रायगड जिल्हा परिषदेचे मार्फत दिला जाणारा रायगड भूषण पुरस्कार करिता नामांकन सुद्धा झालेला आहे. प्रामाणिक, मेहनती,स्वच्छ चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व व देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नवीन शेवा गावचे सुपुत्र प्रतिक प्रविण दर्णे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनचा वर्षात होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai