निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2026
- 73
आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विशेष टपाली मतदान सहाय्यता कक्ष स्थापन
नवी मुंबई ः निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठया संख्येने शासकीय निमशासकीय कर्मचारी कार्यरत असतात. निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असताना कर्मचाऱ्यांचा मतदार म्हणून मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार टपाली मतदान सुविधा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्राधान्याने रायगड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच नवी मुंबईतील सिडको व इतर शासकीय निमशासकीय कार्यालये, खाजगी शाळा येथील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांकरिता तसेच जे कर्मचारी नवी मुंबईचे मतदार आहेत मात्र त्यांची नेमणूक निवडणूक कर्तव्यावर झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विशेष टपाली सहाय्यता मतदान कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती याविषयाच्या नोडल अधिकारी तथा उपआयुक्त स्मिता काळे यांनी दिली आहे. याकरिता नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणी असलेले अधिकारी कर्मचारी यांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव व नंबर तपासून ते ज्या प्रभागात मतदार आहेत त्या प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 8 जानेवारी 2026 रोजी प्रपत्र पीबी 1 नमुन्यात आपले सूचनापत्र /अर्ज देऊन मतपत्रिकेची मागणी करावयाची आहे. यासोबत त्यांनी आपला निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती झाल्याचा आदेश जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत टपाली मतपत्रिका देण्यात येईल. संबंधित अर्जदाराने पीबी 7 मध्ये दिलेल्या सूचनांचे अवलोकन करुन आपले मत टपाली मतपत्रिकेवर नोंदवायचे आहे. आणि सदर मतपत्रिका व अन्य आवश्यक नमुने नियमामध्ये नमूद पध्दतीने बंद लिफाफ्यात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पुन्हा जमा करणे आवश्यक आहे. अर्जदारांना आपले टपाली मतदान नोंदविण्याकरिता मदतीसाठी आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष टपाली मतदान सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी दि. 08, 09, 10, 11, 12 जानेवारी 2026 या पाच दिवसांत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास टपाली मतदानाबाबत मार्गदर्शन व सहाय्य मिळेल.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय स्तरावरही विशेष टपाली मतदान सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याबाबत सर्वच महापालिकांमध्ये सुसूत्रता व समन्वय रहावा यादृष्टीने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व महापालिकांचे आयुक्त यांना पत्र लिहून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मतदार असणारे आणि त्या महानगरपालिका कार्यालयाकडे निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दयावी असे पत्राव्दारे कळविले आहे. अशाच प्रकारचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनाही देण्यात आलेले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai