पालिका पत्रकार कक्षात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2026
- 75
नवी मुंबई ः पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध वृत्तपत्र व वृत्तचित्र वाहिनीच्या प्रतिनिधी, कॅमेरामॅन यांच्या उपस्थितीत प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते दर्पणकारांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकारांना गुलाबपुष्प प्रदान करुन महापालिका प्रशासनमार्फत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी ब्रिटीश सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी ‘दर्पण’मध्ये मराठी भाषेतील उभ्या स्तंभाच्या शेजारी त्याच मजकूराचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’कारांनी पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता अत्यंत निष्ठेने व निस्पृह वृत्तीने आपले वृत्तपत्र चालवले अशा ‘दर्पण’च्या प्रकाशनदिनी अर्थात पत्रकारदिनी आचार्यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पत्रकार मित्र मोठया संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai