टीओडी मीटर ग्राहकांना 4 कोटी 13 लाखांची सवलत
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2026
- 90
घरगुती मीटर धारकांना 80 पैसे प्रति युनिट सूट
मुंबई ः सध्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी आधुनिक पद्धतीचे स्मार्ट टीओडी मीटर लावण्यात येत आहे. सदर मीटर ग्राहकांना रियल टाईम वीज वापराची माहिती देऊन वीज वापरात पारदर्शकता आणते. विशेष म्हणजे सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान वीज वापर करणाऱ्या घरगुती टीओडी मीटर धारकांना 80 पैसे प्रति युनिट सवलत मिळत आहे. महावितरणच्या भांडुप परिमंडलात सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या तीन महिन्यात 12 लाख 81 हजार वीज ग्राहकांनी या विशिष्ट वेळेत वीजवापर करून रु. 4 कोटी 13 लाखाची सवलत घेतली आहे.
टीओडी मीटर मुळे ग्राहकांना अचूक बिलिंग मिळते व रियल टाईम मध्ये वीज वापराबाबत माहिती मिळते. ज्यामुळे ग्राहक वीजवापर करण्याचे चोख नियोजन करून वीजबिलात बचत करू शकतात. महावितरणच्या भांडुप परिमंडलात टीओडी मीटर वापर करून वीजबिलात सवलत घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सेप्टेंबर 2025 मध्ये पेण मंडळातील 1 लाख 40 हजार 565 ग्राहकांनी 26 लाख 20 हजार रुपयांची टीओडी सवलत घेतली, ठाणे मंडळात 1 लाख 21 हजार 451 ग्राहकांनी 54 लाख 43 हजार इतकी टीओडी सवलत घेतली तर वाशी मंडळातील 1 लाख 38 हजार 239 ग्राहकांनी 56 लाख 94 हजार एवडी टीओडी सवलत घेतली. तर, ऑक्टोबर 2025 मध्ये पेण मंडळातील 1 लाख 40 हजार 226 ग्राहकांनी 22 लाख 03 हजार रुपयांची टीओडी सवलत घेतली, ठाणे मंडळात 1 लाख 35 हजार 804 ग्राहकांनी 50 लाख 38 हजार व वाशी मंडळातील 1 लाख 50 हजार 860 ग्राहकांनी 50 लाख 90 हजार एवडी टीओडी सवलत घेतली. त्याचप्रमाणे, नोव्हेंबर 2025 मध्ये पेण मंडळातील 1 लाख 46 हजार 471 ग्राहकांनी 25 लाख 27 हजार रुपयांची टीओडी सवलत घेतली, ठाणे मंडळात 1 लाख 48 हजार 397 ग्राहकांनी 64 लाख 03 हजार इतकी टीओडी सवलत घेतली तर वाशी मंडळातील 1 लाख 59 हजार 026 ग्राहकांनी 63 लाख 56 हजार एवडी टीओडी सवलत घेतली. सेप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या तीन महिन्यात 12 लाख 81 हजार वीज ग्राहकांनी या विशिष्ट वेळेत वीजवापर करून रु. 4 कोटी 13 लाखाची सवलत घेतली आहे.
मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल, संजय पाटील म्हणाले कि, टीओडी मीटरमुळे विजेच्या वापराविषयी अचूक माहिती मिळते. यामुळे विजेच्या बिलांमधील तफावतीबद्दलच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे वीज वापराचा तपशील समजतो. ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येते. या स्मार्ट मीटरमुळे वीजचोरी आणि गैरप्रकार रोखण्यास मदत होते आणि पारदर्शकता वाढते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai