उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले भोजने निवडणुकीसाठी पात्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2026
- 46
मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग 17 अ (वाशी) मधील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेले भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज अनधिकृत बांधकाम प्रकरणी अवैध ठरविण्यात आला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयाचे दरराजे ठोठावले असता न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशाला व संबंधित प्रभागाच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे दोन्ही स्थगिती आदेश उठवले असून या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास परवानगी देऊन निवडणूक लढवण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याला दिले.
मालमत्तेवर बेकायदा बांधकाम असल्याचे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक /अधिकाऱ्याने महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम 10 (1 डी) अंतर्गत फेटाळला होता. निवडणूक अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या 31 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशाला भोजने यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे कलम भोजने यांना लागू होत नसतानाही, निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून अधिकारांचा बेकायदेशीर आणि मनमानी वापर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे निरीक्षण खंडपीठाने गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी नोंदवले होते व निवडणुकीला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवावी अन्यथा प्रभागातील निवडणूक प्रक्रिया खोळंबेल, असा दावा करून निवडणूक आयोगाने ही स्थगिती उठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये हे कलम केवळ निवडून आलेल्या नगरसेवकाला लागू होते, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर नाही, असेही मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भोजने यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai