आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाखांची रोकड
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2026
- 48
नवी मुंबई ः महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने 27 स्थिर संनिरीक्षण पथके स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. यामध्ये एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर एका वाहनातून एकूण रू. 16,16,000 इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध 9 ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये 24 तासात 27 स्थिर संनिरीक्षण पथके स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, दि. 9 जानेवारी रोजी, दुपारी 12.30 वा. दरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तुषार दौंडकर तसेच प्रशासकीय अधिकारी संजीव पवार यांच्या नियंत्रणाखाली एकूण रू. 16,16,000 इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai