3.6 लाख फुकट्या प्रवाशांवर कोकण रेल्वेचे कारवाई
- by मोना माळी-सणस
- Jan 10, 2026
- 37
दंडापोटी रु. 20.27 कोटी रक्कम वसूल
नवी मुंबई ः विना तिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत व आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेमार्फत सातत्यपूर्ण तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. यामध्ये जानेवारी ते डिसंबर 2025 या कालावधीत 8,481 विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या असून 3,68,901 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी 20.27 कोटी रक्कम वसूल करण्यात आली.
स्वस्त आणि सुरक्षित या तत्वामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. भारतातील अंत्यत आव्हानात्मक आणि सुंदर रेल्वे मार्गापैकी कोकण रेल्वेमार्ग एक आहे. या मार्गावर प्रवासी, मेल एक्सप्रेस, सुपरफास्ट गाड्या धावत असतात. पर्यटकांकडूनही या मार्गाला विशेष प्राधान्य दिले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष सुविधा, मोहिमा राबवल्या जातात. सघन तपासणी करुन तिकीटविरहीत प्रवाशांवरही कारवाई केली जाते. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 8,481 विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांमध्ये 3,68,901 तिकीटविरहित/अनियमित प्रवासाच्या प्रकरणांची नोंद झाली असून, भाडे व दंडापोटी एकूण 20.27 कोटी रकमेची वसुली करण्यात आली. यामध्ये केवळ डिसेंबर 2025 महिन्यात कोकण रेल्वेने एकूण 998 विशेष तिकीट तपासणी मोहिमा आयोजित केल्या. या दरम्यान 43,896 तिकीटविरहित व अनियमित प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून देय भाडे व दंडापोटी एकूण 2.45 कोटी रक्कम वसूल करण्यात आली.
या विशेष मोहिमा रेल्वे संरक्षण दल व रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावरील विविध गाड्या व स्थानकांवर राबवण्यात येत आहेत. कोकण रेल्वे सर्व प्रवाशांना वैध तिकीटासहच प्रवास करण्याचे आवाहन करत असून, अन्यथा गैरसोय व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे नमूद केले आहे. तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस