स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी पालिका दक्ष
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2026
- 38
नवी मुंबई ः स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसंपन्न शहर अशीही नवी मुंबईची ओळख असून नागरिकांना समाधानकारक स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा स्वरुपात पुरविण्यातही नवी मुंबई महानगरपालिका आघाडीवर आहे. याकरिता महापालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमितपणे व सातत्याने तपासली जात असते.
इंदोर शहरात नुकत्याच पिण्याच्या पाण्यातून घडलेली दुर्घटना बघता पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी व सांडपाण्याची वाहिनी जवळजवळ असल्यास अशाप्रकारची दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नमुंमपा क्षेत्रात यादृष्टीने संपूर्ण काळजी घेत आवश्यक ती अधिकची खबरदारी घेण्याच्या तसेच जल संकलन, साठा व वितरण व्यवस्थेमधील सर्व स्तरावर तातडीने उपाययोजना करणेबाबत सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागास निर्देश दिले. आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार अतिरिक्त शहर अभियंता स्थापत्य अरविंद शिंदे यांनी महापालिकेचे संबधित सर्व अभियंते व कंत्राटदार यांची तातडीने विशेष बैठक घेत पालिकेच्या मोरबे धरण जलाशयापासून भोकरपाडा जल शुध्दीकरण केंद्र व पुढे मुख्य जलवाहिनी तसेच जलउदंचन केंद्रे आणि जलवाहिन्या व वितरण व्यवस्थेमधील शेवटच्या लाभार्थी घटकापर्यंत जल व्यवस्थापनाच्या सर्व बाबींची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यास अनुसरुन त्वरित कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेषत्वाने गावठाण व अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील घरे असलेले क्षेत्र व झोपडपट्टी भागात विशेष दक्षता घेण्याचे व संपूर्ण तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने दैनंदिन करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व तपासणी यामध्ये अधिक वाढ करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने पाणी गुणवत्ता निकषानुसार पाणी पुरवठा करण्यात कायम सातत्य राखण्यासाठी महानगरपालिका अधिक काटेकोरपणे कार्यवाही करीत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai