विधी महाविद्यालयात फूड फेस्ट संपन्न

पनवेल ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकुर विधी महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लेक्चर सिरीज, रोझ डे, मिस-मॅच डे, ट्रॅडीशनल डे, मराठी भाषा दिवस, सारी डे आणि फूड फेस्ट आशा नानावीध शैक्षणिक, सांस्कृतीक आणि शिक्षणेतर कार्यक्रमांची रेलचेल होती. शनिवारी महाविद्यालयात फूड फेस्ट-2020 चे आयोजन करण्यात आले होते. याफूड फेस्ट चे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा प्रशांत ठाकूर, सदस्या, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेल आणि अ‍ॅड. वृशाली वाघमारे, नगरसेविका, पनवेल महानगर पालिका या उपस्थित होत्या. 

या स्पर्धेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून व्हाईट चिकन, कोळंबी भाकरी, मटन भाकरी, चिकन ग्रेव्ही आणि भाकरी, मिसळ पाव, कॉर्न लॉलीपॉप, पुराणपोळी, मोदक, पाणीपुरी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, चॉकलेट यासारखे नानाविध शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ अत्यंत माफक दरात सादर केले. या स्पर्धेत पदार्थाचे सादरीकरण, स्वच्छता आणि चव अशा बाबींसाठी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आणि मुख्य अतिथी वर्षा ठाकूर आणि अ‍ॅड. वृशाली वाघमारे यांनी सर्व बाबी पडताळून गुणांकण केले आणि सर्वाधीक गुण मिळविणार्‍या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांना प्रशस्तीपत्रके वितरीत केली. यास्पर्धेत मांसाहारी पदार्थांत कु. गुलाब खुटले हिला चिकन, मटन, कोळंबी फ्राय-भाकरी’ या पाककृतीसाठी प्रथम तर कु. निदा टोले हिला व्हाईट चिकन या पाककृतीसाठी व्दितीय पारितोषिक देण्यात आले आणि शाकाहारी पदार्थांत कु. प्रतीक्षा ठाकूर हिला कॉर्नलॉलीपॉपया पाककृतीसाठी प्रथम तर कु. पूर्णिमा पाटेकर हीला रंगीत मोदक या पाककृतीसाठी व्दितीय पारितोषिक देण्यात आले. खाण्याच्या नानाविध पदार्थांची रेलचेल असल्यामुळे विद्यार्थ्यानी या फुड फेस्ट -2020 चा मनमुराद आनंद लुटला.