फडणवीसांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 03, 2020
- 919
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी आता खटला चालणार आहे.
फडणवीस यांनी 2014 रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील दोन गुन्हे लपवले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे निर्देश नागपूरमधील न्यायालयाला दिले होते. त्यानंतर फडणवीस यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ओपन कोर्टात सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती. मात्र, आजच्या सुनावणीच्यावेळी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai