दिल्लीत मोठा राजकीय भूकंप
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 22
आम आदमी पक्षाचे 7 खासदार भाजपात
नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, त्यांनी पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांसोबत भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे जाहीर केले आहे. या खासदारांमध्ये क्रिकेटर हरभजनसिंग, संदीप पाठक यांच्यासह 7 खासदारांचा समावेश आहे.
आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन हटवलं होते. त्यानंतर आपने अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही धुरा सोपवली होती. मात्र, राघव चड्ढा यांनी शुक्रवारी संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी घटनात्मक तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटल्याचा आरोप केला. चड्ढा म्हणाले की, ज्या पक्षासाठी मी 15 वर्षे मेहनत घेतली, तो आता आपल्या मूलभूत तत्त्वांपासून दूर गेला आहे. हा पक्ष देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. चड्ढा पुढे म्हणाले, राज्यसभेत आपचे 10 खासदार आहेत आणि त्यापैकी दोन-तृतीयांशहून अधिक खासदार या बाबतीत आमच्यासोबत आहेत. त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आज सकाळीच आम्ही ते स्वाक्षरी केलेले पत्र व संबंधित कागदपत्रे राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली आहेत. मी चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव गेल्या काही वर्षांत होत होती. त्यामुळे आज मी पक्षापासून दूर होत असून जनतेच्या जवळ जात आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, आम्ही आमचा राजकीय प्रवास पुढे नेताना देशासाठी काम करू, असेही सांगितले.
या घडामोडींमुळे दिल्लीसह राष्ट्रीय पातळीवर राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.
- राघव चड्ढांसोबत कोणते खासदार आहेत?
हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रमजीत सिंह सहनी, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, अशोक मित्तल - राज्यसभेतील आपचे एकूण सदस्य
राघव चड्ढा (पंजाब), संदीप पाठक (पंजाब), संजय सिंह (दिल्ली), अशोक मित्तल (पंजाब), हरभजन सिंग (पंजाब), विक्रमजीत सिंह साहनी (पंजाब),बलबीर सिंह सीचेवाल (पंजाब), स्वाती मालीवाल (दिल्ली), एन. डी. गुप्ता (दिल्ली)संजीव अरोरा - केजरीवाल यांची प्रतिक्रिया
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या फुटलेल्या खासदारांचा त्यांच्या प्रतिक्रियेत कुठेही उल्लेख केला नाही. केजरीवालांच्या पोस्टमध्ये भाजप आणि पंजाबचा उल्लेख आहे. भाजपने पंजाबला पुन्हा धोका दिला, असं म्हणत केजरीवालांनी फुटलेल्या खासदारांचा अनुल्लेख करत ट्विट करुन संताप व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai