नेरूळमधील रेसिंग ट्रॅकला विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 24
स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना आक्रमक; पर्यायी जागेची मागणी
नवी मुंबई ः इंडियन रेसिंग फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या फॉर्म्युला-4 कार रेसिंगसाठी नेरूळ सेक्टर 26 येथील बामणदेव मैदानावर रेसिंग ट्रॅक उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मैदानावर ट्रॅक उभारल्यास खेळाचे मैदान नष्ट होईल तसेच झाडांची कत्तल होण्याची शक्यता असल्याचे सांगत पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या नियोजनानुसार या मैदानावर रेसिंग ट्रॅक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी सुमारे 45 ते 50 झाडे तोडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या हक्काचे मैदान वाचवण्यासाठी शिवसेना व स्थानिक ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. नवी मुंबईत होणाऱ्या फॉर्म्युला 4 रेसिंग कार स्पर्धेला आमचा विरोध नाही. मात्र, रेसिंग ट्रॅक बामणदेव खेळाच्या मैदाना ऐवजी पर्यायी मार्गांचा प्रशासनाने विचार करून त्या ठिकाणी ट्रॅक उभारावा. शहरातील स्थानिक भूमिपुत्र खेळाडूंसाठी असणाऱ्या मैदानाचा खेळासाठीच वापर झाला पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे महापौर सुजाता पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक व क्रीडा समिती सदस्य अनिकेत म्हात्रे, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, गटनेते मनोज हळदणकर, नगरसेवक जगदीश गवते तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
- नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पामबीच मार्ग व परिसरात प्रस्तावित फॉर्म्युला 4 कार रेस संदर्भात सार्वजनिक हित, पर्यावरणीय परिणाम तसेच सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी यासंदर्भात सविस्तर निवेदन पालिका आयुक्त तसेच शहर अभियंता यांना दिले आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सुमारे 97 वृक्ष बाधित होण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रस्तावित करताना पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नियमांचे पालन झाले आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून -4 प्रकल्पासंबंधी सर्व कामांची स्वतंत्र चौकशी करावी, सार्वजनिक निधीचा वापर नियमांनुसार झाला आहे का याची पडताळणी करावी तसेच आवश्यक पर्यावरणीय व प्रशासकीय परवानग्यांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai