नूतन महिला मंडळाचा पन्नास वर्षांचा प्रेरणादायी प्रवास उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 22
नवी मुंबई ः वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात नूतन महिला मंडळाचा सुवर्ण महोत्सवी (50 वा) वर्धापन दिन 18 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नवी मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त ललिता बाबर तसेच नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सन 1976 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या गोरे यांच्या पुढाकारातून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाशी सेक्टर 1 येथील सिडको कार्यालयात नूतन महिला मंडळासह टाऊन लायब्ररी, फिल्म क्लब, स्पोर्ट्स क्लब आणि सोशल सर्विस लीग अशा पाच संस्थांची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षी नूतन महिला मंडळाची धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी झाली.
स्थापनेच्या वेळी के.व्ही. महाराष्ट्र अध्यक्ष, जॉयसी प्रोजार्य उपाध्यक्ष, हंसा नाईक सचिव, मीना कोठारे सहसचिव, मालिनी चिंबलगी खजिनदार, वैद्य नायक व डी. एम. कौसाडीकर अशा आठ सदस्यीय समितीने 1988 पर्यंत मंडळाची धुरा सांभाळली. 1988 नंतर नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून मंडळाच्या कार्याला नवे बळ मिळाले. सिडकोने वाशी सेक्टर 3 येथे उभारलेल्या समाज मंदिरात मंडळाला जागा उपलब्ध झाली. पुढे शरयू देशपांडे यांनी 1996 ते 2024 या 28 वर्षांच्या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम करत मंडळाला स्थैर्य व भक्कम दिशा दिली. मंडळातर्फे दर महिन्याला विविध सामाजिक, सांस्कृतिक व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच 1986 मध्ये सुरू झालेल्या बालवाडी उपक्रमातून अनेक बालकांना शिक्षणाची गोडी लावण्यात आली. मात्र 2017-18 मध्ये इमारत पुनर्बांधणीमुळे हा उपक्रम थांबवावा लागला. सन 2005-06 मध्ये मंडळाच्या कार्याची दखल घेत नवी मुंबई महापालिकेने प्रतिष्ठेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करून गौरव केला. महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक साक्षरता, स्वसंरक्षण प्रशिक्षण, योग वर्ग, ओमकार साधना तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतात. कोविड काळातही ऑनलाइन माध्यमातून उपक्रम सुरू ठेवत महिलांमध्ये संपर्क कायम ठेवण्यात आला.
सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मंडळाच्या 50 वर्षांच्या वाटचालीवर आधारित दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू देशपांडे यांनी केले, तर अहवाल सादरीकरण दीपा कुलकर्णी व गायत्री साटम यांनी केले. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सभासद भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai